स्व. ॲड. नमिता नाईक यांचा स्मृतीदिन साजरा
रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- माजी नगराध्यक्ष स्व. ॲड. नमिता प्रशांत नाईक यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त अलिबाग शहर महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत भाजी व मच्छी विक्रेत्या महिलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. महिलांच्या प्रत्यक्ष गरजा ओळखून त्यांना दिलासा देणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला आहे.
”अलिबागची अस्मिता” म्हणून ओळखली जाणारी स्व. ॲड. नमिता नाईक यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. या कार्यक्रमाला अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील, शैला पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक वृषाली ठोसर, ॲड. हजारे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन अलिबाग शहर महिला आघाडीने केले असून, सर्व महिलांचे सहर्ष स्वागत करण्यात आले होते.