मूल असे घडते —
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
करिअर बहूविविधता.
चांगलं शिक, भरपूर अभ्यास कर, एकदा पदवी मिळाली की नोकरी लागेल, करियर घडेल, मग आयुष्याचे सार्थक होईल, सगळी चिंता मिटेल, अशी धारणा आत्तापर्यंत नक्कीच होती व ती बरोबरच होती.
पण आत्ताच्या ए आय च्या जमान्यात खाजगी, विनाअनुदानित, अनुदानित, शासकीय, निमशासकीय, देशी , परदेशी अशा कोणत्याही नोकरीची व स्पर्धा असल्याने व नाविन्याची आस असलेला ग्राहक समोर असल्याने व्यवसायाची सुद्धा शाश्वती नाही.
तसेच पूर्वीच्या काळी व आजवर एकाच नोकरीत व व्यवसायात करिअरची सुरुवात व शेवट होऊन आयुष्याची परिपूर्णता सुखा समाधानाने होत असे.
परंतु आता यात अमुलाग्र बदल झालेला आहे. नोकरी व व्यवसायात काळानुरूप मंदी येऊ शकते. त्यावेळी *आवड* *संधी* व *क्षमता* असलेल्या दुसऱ्या क्षेत्रातही पुन्हा नव्या उत्साहाने प्रारंभ करून करिअर यशस्वी करून दाखविता आलं पाहिजे.
म्हणजेच हे लक्षात ठेवा, आता आयुष्यात एक नव्हे तर अनेक करियर्स होऊ शकतात.
तसेच एकच नोकरी व व्यवसाय करून पठारावस्था येऊ नये, तुम्ही दुसऱ्या करिअरमध्ये प्रवेश करून यशस्वी होऊ शकता. कधी कधी शिक्षण एक घेतले जाऊ शकते पण करियर आपलं यात नाही तर दुसऱ्याच क्षेत्रात आहे याचा साक्षात्कार होऊन करिअर नवीनच क्षेत्रात केले जाते. माझ्या सुमित नावाच्या सोलापूरच्या भावाने अभियंता पदवी घेतली पण त्यात त्याला रस वाटला नाही. आपण इंजिनियर या जमातीत 14 तास स्क्रीन शेअर करू शकत नाही, असे लक्षात आल्याने त्याने बेंगलोर येथे एम ए एज्युकेशन करून आज तो अनुताई वाघ व ताराबाई मोडक या महोदयांच्या संस्थेत अनुभव घेऊन लहान मुले अंगणवाडी, शिक्षिका यांचेवर नाविन्यपूर्ण प्रयोग करून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहे व त्यात तो खूपच समाधानी आहे.
ज्यात समाधान अतिशय आनंद मिळेल अशी करिअर आपल्या आयुष्यात केली पाहिजेत.
तसेच एकाच वेळेला अनेक क्षेत्रात पण करिअर होऊ शकतात. प्रत्येक गोष्ट आपण स्वतः न करता आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहून मदतनिसांच्या सहाय्याने आपण यशस्वी होऊ शकतो.
जसे कोकणात मासेमारी, कॉटेज, हॉटेल, विक्रम चालक व आंबावाडी असे बहुविध व्यवसाय लोक करतात.
शेतकरी शेती, दुग्ध व्यवसाय, कोंबडी व वराह पालन, नर्सरी, गुळाचे गुऱ्हाळ, ट्रॅक्टर, जेसीबी चालक, इत्यादी व्यवसाय एकाच वेळी करतात.
थोडक्यात कमी प्रवास, अति राजकारण,c दोनच हात कमावणारे, सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला, खोटे बोल पण रेटून बोल, आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष, आर्थिक निरक्षरता, दूरदृष्टीचा अभाव, ऐतिहासिक स्वमग्नता, गृहकलह, नातेवाईकांशी चांगली संबंध नसणे, कोर्टकचेरी, समाज अर्थ पुरवठ्याची पद्धत, जनरेशन गॅप, ज्ञानापेक्षा प्रमाणपत्रावर भर, धरसोड वृत्ती, कष्टाची लाज, फालतू बाबींना महत्त्व, दुसऱ्याच्या अपयशात आनंद, इंग्रजी कच्चे, संवाद कौशल्याचा अभाव, चाकोरी न मोडणे, जातीप्रथा, वेळेची किंमत नसणे व ग्राहकाला किंमत न देणे
या गोष्टी टाळल्या तर आपण आयुष्यात बहुविध करिअरमध्ये यशाचे शिखर गाठू शकतो.
लक्षात ठेवा ठराविक *व्यवसाय* *प्रतिष्ठित* नसतो तर आपण ठरविलेल्या व्यवसायाला आपण प्रतिष्ठितता मिळवून द्यायची असते.
शुभास्ते पंथान: संतु ll
*श्रीमान* *ज्ञानेश्वर* *विठ्ठल* *कुलकर्णी* .
संस्कृत अध्यापक तथा करिअर मार्गदर्शक, समुपदेशक.
लेखक २१ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात संस्कृतभाषातज्ञ आणि व्यवसाय मार्गदर्शक व शालेय समुपदेशक करिअर विज्ञ म्हणून कार्यरत आहेत. महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हाशिवरे येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.