बीड :- अंधश्रद्धा आणी धार्मिकतेच्या नावावर मठामध्ये महिला आणी मुलीवर अत्याचारचे प्रमाण आज खुप वाढलेले दिसून येत आहे. बीड जिल्हातील मांजरसुंबा येथील मठात एका 15 वर्षीय अल्पवयीन तरूणीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली. यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता तब्बल 12 मुलामुलींचीही या मठातून आता सुटका करण्यात आलीय. अंधश्रद्धेपोटी चाललेल्या या घटनेनं पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा हादरा बसला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मांजरसुबा येथील मठात 15 वर्षीय अल्पवयीन तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी मठातीलच एका 40 वर्षीय व्यक्तीवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास करताच त्यांना मठातील हादरून सोडणारी बाब निदर्शनास आली.
लैगिंक अत्याचार झालेल्या मुलीला वयाच्या अवघ्या सहाव्या महिन्यातच पालकांनी नवसाची म्हणून मठात सोडलं होतं. तसेच मठात अजून अनेक मुलं अडकली असल्याची माहितीही पीडित मुलीनं दिली. पोलिसांनी यानुसार मठावर छापा टाकून इतर 12 मुलामुलींची आता सुटका केली आहे.
दरम्यान पोलिसांनी या मुलांची सुटका करून त्यांना बालकल्याण समितीकडे सोपवलं आहे. अंधश्रद्धेपोटी तर काहींनी देवाला नवस बोलला म्हणून या आपल्या पोटच्या मुलांना मठात सोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

 

 

                                                                                                                                                 – प्रशांत जगताप नागपुर ब्युरो चीफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here