*एक झाड कोसळले,दुसरे कोसळण्याच्या मार्गावर*

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट १७/०८/२१
रेल्वे स्टेशन मार्गावरील एल आय सी जवळ एका झाड कोसळले असून दुसरे झाड कोसळण्याच्या मार्गावर आहे.
शहरात अमृत योजने अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे कार्य शुरु आहे. एन पावसाळ्यात सुरू असलेल्या या कामात ठिकठिकाणी गड्डे करण्यात येत आहे. यामुळे झाडाची मुळे सुद्धा तोडल्या जात आहे. त्यामुळे या वृक्षाची मुळे खिळखिळी होऊन ती कोलमडून पडत आहे. एल आय सी जवळील वृक्ष असेच कोलमडून पडले. आणि त्याच्या बाजूचे वृक्ष देखील मुळे कापल्या मुळे खिळखिळे झालेले आहे, आणि कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या बेतात आहे.