मुकुल वासनिक यांचा हिंगणा दौरा !कोरोणा काळात मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या घरी दिली सद् भावना भेट.

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104

हिंगणा : -आज अचानक केंद्रीय काॅंग्रेस कमीटीचे नेते मुकुल वासनिक यांनी हिंगणा तालुक्याला भेट दिली.त्यांच्या या भेटीमुळे तालुक्यात विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या,या आधी नुकतेच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनीही तालुक्यात भेट देत विविध विकासकामांचे भूमिपूजन केले होते.आज अचानक वासनिक यांच्या या दौऱ्याने राजकीय चर्चा ऐकायला येत होत्या.परंतू नंतर कळलं की मुकुल वासनिक यांचा हा राजकीय दौरा नसुन,कोरोणा काळात मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन वासनिकांनी परिवाराचे सांत्वन केले.डिगडोह परिसरातील पोलिस नगर येथे राहत असलेल्या हिंगणा तालुका महिला काॅंग्रेस कमीटीच्या अध्यक्षा शालिनी मनोहर यांचे पती बाबाराव मनोहर यांचे कोरोणा काळात निधन झाले होते तर,काॅंग्रेस कमीटीचे हिंगणा तालुका अध्यक्ष खेमसिंग जाधव यांचेही याचा काळात निधन झाले होते, त्यांच्याही येरणगांव येथे घरी जाऊन परिवाराचे सांत्वन केले.यावेळी त्यांचे सोबत किशोर गजभिये, नाना गावंडे, जिल्हा परिषद माजी सत्ता पक्ष नेते बाबा आष्टणकर,कुंदा राऊत,शिक्षण सभापती भारती पाटील, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, भीमराव कडू, अनिल पाटील, तक्षशिला वागधरे,अशोक पुनवटकर,विनोद उमरेडकर,प्रकाश कोकाटे, दुर्योधन ढोणे,वैशाली मानवटकर,संजय दलाल,,धुमसिंग जाधव,राजू झाडे, नरेंद्र गुंजेकर, सत्येंद्र सिंह, इत्यादी सोबत होते.