खांबेरे ग्रामपंचायत कडून कामे न करता बीले लाटली,भ्रष्टाचाराविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाचा इशारा:शहानवाज मुकादम

51

रोहा पं समिती शेस फंडअंतर्गत खांबेरे ग्रामपंचायत कडून कामे न करता बीले लाटली,भ्रष्टाचाराविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणा चा इशारा:शहानवाज मुकादम

शहानवाज मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी

मो.7972420502

रोहा: अनेक वर्ष एक हाती सत्ता असलेल्या रोहा पं समिती चा कारभार कायम संशयास्पद राहिला आहे, घर कुल योजना मध्ये ही गैर प्रकार आसुन सन:2018 ची काही कामे अपुर्ण आसुन काही पुर्ण घरकुलांची असेसमेंट नोंदच नसलेचे खैरेखुर्द ग्रामपंचायती करुन उघर झाला आसलेने सदर ची बाबतीत ही संशयास्पद स्थितीत दिसत आसुन रोहा पंचायत समिती च्या सेस फंडात ही अनेक कामांत गैर प्रकार झाले चे समोर अल्याने एकच खळबळ उडाली आहे,पं समिती च्या सेस फंडा ची बिले कामे न करताच बिले लाटली गेल्या ची धक्कादायक माहिती माहिती आधिकारातुन उघर झाल्या ने पं समिती ने पुन्हा नव्याने गैर कारभाराचा गौरवच प्राप्त केल्या ची टीका चोहोबाजुने सुरु झाली आहे,सेस फंडा च्या आंतर्गत तालुक्यातील अनेक कामांची माहिती मागीतली असता अनेक महत्वाची कामे झाली नाहीत,काही कामे झाल्याचे खुद्द ग्राम पंचायतीला माहीत नाही या मुळे सेस फंडातुन कामे पुर्ण झाल्याचे कागदोपत्री सांगत लाखो रुपयांची बिल लाटली हे मागविलेल्या माहिती तुन स्पष्ट दिसत आहे, तसेच बिरवाडी कब्रस्तान मुरुम टाकणे चे ही कामे न करता बिले आदा केलेने संबंधित नेते करुन फोन द्वारे तक्रार माघार घेणे ची समज मिळाली आहे. 

सदर विषयी पंचायत समिती रोहा येथे तक्रार केली आसता दि:15/07/2022,चे सहायक प्रशासन अधिकारी,पं स रोहा

यांच्या करुन मिळालेल्या पत्रा नुसार ग्रामपंचायत खांबेरे येथील बिरवाडी कब्रस्तान पर्यंत मुरुम टाकणे या कामा ची चौकशी करणे कामी मा.उप अभियंता(बांधकाम)राजिप उप विभाग रोहा यांना आदेशित करण्यात आले होते.

 मा.उप अभियंता श्री गीरी साहेब राजिप उप विभाग रोहा यांनी दि:03/08/2022,रोजी बिरवाडी कब्रस्तान पर्यंत रस्त्या ची पाहणी केली केलीआसता सदर ठिकाणी मुरुम चे कामच झाले नसले चे मान्य केले आसले चे कॉल रेकॉर्डिंग आहे.असे आसुन ग्रामपंचायत खांबेरे चे ग्रामसेवक श्री पाटील यांच्याकडून सदर कामाची माहीती निरंक मिळाली आहे.

पंचायत समिती रोहा कार्यालयातील मिळालेली माहीतीत काम झालेचे म्हनतात मात्र कामाचे खोटे फोटो दिलेने सदर ची माळालेली माहिती ही दिशाभुल करणारी आहे,कारन कधी म्हनतात कब्रस्तान येथे मुरुम टाकण्यात आले तर कधी बिरवाडी कब्रस्तान पर्यंत मुरुम टाकण्यात आला तरी नेमका काय प्रकार आहे भ्रष्टाचारांना वाचविण्या चा हा सर्व प्रकार दिसत आहे.

नेमके खडे कोन बोलतात हे प्रश्न चिन्ह आहे.मा.गट विकास अधिकारी रोहा यांनी स्वत: दखल घेउन तक्रार दाराला विश्वासात घेऊन सदर कामाची पाहणी करुन संबंधित अधिकारी सरपंच ग्रामसेवक व ठेकेदार यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार,फसवनुक,दप्तर छेडछाड,शासना ची व तक्रारदारा ची दिशाभुल केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

अन्यथा एका आठवड्यात कारवाई न झाल्यास रितसर नोटीस बजावून पंचायत समिती कार्यालया समोर उपोषणास बसण्यात येइल हा इशाराच मिडीया वार्ता न्युज चे रोहा शहर प्रतिनिधी शहानवाज मुकादम यांनी दिला आहे.