रोहातील बारसोली (धाटाव) गावातील महिलांनी एकत्रित येऊन आजादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला

रोहातील बारसोली (धाटाव) गावातील महिलांनी एकत्रित येऊन आजादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला

रोहातील बारसोली (धाटाव) गावातील महिलांनी एकत्रित येऊन आजादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला

: ✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ (कोकण )
📞8080092301📞

माणगांव ‘-बारसोली गावातील युवक कृतिशील असल्याने नेहमीच ते गावात विविध उपक्रम राबवत असतात. येत्या १५ ऑगस्ट२०२२ ला भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि कर्तृत्व जाणून घेण्यासाठी, स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारत सरकारने पुढाकार घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. भारतीय राष्ट्रध्वज हे संपूर्ण राष्ट्रासाठी राष्ट्रीय अभिमानाचे प्रतिक आहे. त्याचा आदर करणेआणि प्रत्येक भारतीयाला त्याच्याशी जोडणे आणि घरोघरी पोहचवणे या उद्देशाने हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जात आहे. यावेळी ७५ वा स्वातंत्र्य दिन आजादी का अमृत महोत्सव म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातोय. म्हणून बारसोली गावातील युवकांनी व महिलांनी एकत्रित येऊन ग्रामदैवत श्री बापूजी देव मंदिरात सुरेख रांगोळ्या काढून आजादी का अमृत महोत्सव साजरा केला. पंतप्रधान मोदीजींच्या हर घर तिरंगा या अभियानात या गावात प्रत्येकाच्या घरी तिरंगा लाऊन ग्रामस्थांनी सहभाग दर्शवला.