स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त मिश्र बसंत प्रतिष्ठान तर्फे वह्यांचे वाटप.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त मिश्र बसंत प्रतिष्ठान तर्फे वह्यांचे वाटप.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त मिश्र बसंत प्रतिष्ठान तर्फे वह्यांचे वाटप.

तन्मय सुनिल जैन
सोयगाव तालुका प्रतिनिधि
7588165274

आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त बनोटी येथील श्री जयहिंद शिक्षण संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा येथे झेंडा वंदन नंतर विद्यार्थ्यांना वहिंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश संयोजक अल्पसंख्यांक मोर्चा युवा सोशल मीडिया चे श्री तन्मय सुनिल जैन,शितल उमेश जैन तसेच संस्थेचे सचिव श्री सोनावणे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी श्री सोनावणे सर यांनी संत गाडगे बाबा यांची आठवण काढत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर तन्मय जैन यांनी त्यांचे आजोबा स्व श्री मिश्रीलाल श्रीमल जैन यांची सामाजिक धुरा चालवण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्याना शैक्षणिक,सामाजिक,राजकीय किंवा कोणतेही मदत लागत असेल तर मिश्र बसंत प्रतिष्ठान मार्फत करण्यात येईल असेही सांगितले.
या उपक्रमास श्री मिश्रीलाल जैन यांचे चिरंजीव श्री दिलीप जैन,पारस जैन व सुनिल जैन यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.