महात्मा फुले हायस्कूल हिवरखेड येथे भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन, तसेच गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

महात्मा फुले हायस्कूल हिवरखेड येथे भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन, तसेच गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

महात्मा फुले हायस्कूल हिवरखेड येथे भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन, तसेच गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

✍ हर्षल राजेंद्र पाटील ✍
📰 मोर्शी तालुका प्रतिनिधी 📰
📱 8600650598 📱

हिवरखेड (ता.मोर्शी जि.अमरावती ) : – सर्वोदय शिक्षण समिती हिवरखेड द्वारा संचालित महात्मा फुले हायस्कूल, महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय व सौ. गंगाबाई सीतारामजी चौधरी कन्या हायस्कूल हिवरखेड येथे भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन तसेच बक्षीस वितरण व गुणवंत विध्यार्थांचा सत्कार समारंभ आज 15 ऑगस्ट 2022 ला संपन्न झाला
कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. श्री. साहेबरावजी वानखडे, प्रमुख पाहुणे मा. श्री. नंदकिशोर भाऊ श्रीखंडे, नंदकिशोर भाऊ गांधी, मंगेशभाऊ ना. धरमकर , शुभम भाऊ यावले, भोजराजभाऊ रायचुरा तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. साहेबरावजी पाटील, उपाध्यक्ष वसंतरावजी तडस, सचिव प्रकाशराव भोजने, व संस्थेचे सदस्य रविंद्रजी वासनकर, मनोहरराव पाटील पांडुरंगजी पाटील, शर्मा सर, रमेशराव भोजन व सेवानिवृत्त शिक्षक मा. श्री. पंजाबरावजी ढोरे, निभेकर सर, कोरडे सर यांच्या उपस्थितित महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले
तसेच प्रमुख पाहुण्यांनी शाळेतील मुलांना मार्गदर्शन केले आणि शाळेत इंटरमीजीएट ग्रेट स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल कु. श्रावणी कि. गहुकर, कु. भूमिका मो. पाचघरे, कु. इशिका सु.कपिले, कु. श्रेया हरले यांचा सत्कार करण्यात आला तसेच
*वर्ग 5,6,7,8,9 मधून प्रथम क्रमांक येणारे विद्यार्थी*
– कु. साक्षी विनोदराव तडस, वर्ग 5 : 84.00%
– कु. आर्या प्रवीणराव भुंते, वर्ग 6 :
91.55%
– कु. वेदिका मंगेशराव पाटील, वर्ग 7 : 95.00%
– कु.भार्गवी किशोरराव गहूकर, वर्ग 8 : 93.22%
– वर्ग 9 मधून कु. आलिया शेख शकील 92% तसेच
– वर्ग 9 मधून चि. मंथन प्रकाशराव डवरे 85.16%

एस. एस. सी. परीक्षा मार्च 2022 मधून हिवरखेड गावातून व शाळेतून सर्वप्रथम कु. मधुरा अशोकराव पाटील हिला 97.60% मिळाले त्याबद्धल तिचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळेतून द्वितीय क्रमांक कु. गौतमी अरविंदराव आमले हिला 96.40% व तसेच गुणांनुक्रमे तृतीय क्रमांक कु. दिव्या गोपाळराव दरोकर 94.20% , कु. श्रावणी किशोरराव गहूकर 94.20% , चि. प्रथमेश ज्ञानेश्वरराव डवरे 94.20 % मिळाल्या बद्धल सत्कार करण्यात आला.
एच. एस. सी. परीक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये सर्वप्रथम क्रमांक कु. आरती नेहरूजी हरसे 81.00% मिळाल्याबद्दल बक्षीस व सत्कार करण्यात आला आणि सर्व विषयात सर्वात जास्त गुण मिळवलेल्या विध्यार्थांचा सत्कार करण्यात आला
सौ. गं. सी. चौ. कन्या हायस्कूल मधून एस. एस. सी. परीक्षा मार्च 2022 मध्ये प्रथम क्रमांक कु. भूमिका प्रफुलराव पाटील हिला ( 84.20 % ) मिळाल्याबद्दल बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. तसेच द्वितीय क्रमांक कु. अंजली कैलासराव नागले 84.00 % आणि त्तृतीय क्रमांक कु. समीक्षा सुरेशराव पाचारे हिला 83.80% गुण मिळाल्याबद्धल सत्कार करण्यात आला व सर्व विषयात सर्वाधिक गुण मिळविलेल्या विध्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन श्री. इंगळे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुनंदाताई दातीर मॅडम यांनी केले तसेच बक्षीस वितरण संचालन श्री. सुनील नाईक सर, श्री प्रदीप उघडे सर, श्री. हिंगणे सर, व पाथसंचलन श्री किशोर गहूकर सर यांनी केले तसेच पाहुण्यांचे आभार श्रीमती गडेकर मॅडम व सौ. संजयाताई टाक मॅडम यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्याथ्यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रमुख पाहुणे, सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, शाळेतील विध्यार्थी तसेच गावातील उपस्थित सर्व मंडळी यांनी हिवरखेड गावचे नागरिक, शाळेचे माजी विध्यार्थी, तसेच शाळेत काही दिवस कार्यरत असलेले स्व.श्री. मोहनभाऊ मुकिंदराव उपासे यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.