राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटक जिल्हा महासचिव पदी कैलाश कोरेत यांची वर्णी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटक जिल्हा महासचिव पदी कैलाश कोरेत यांची वर्णी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटक जिल्हा महासचिव पदी कैलाश कोरेत यांची वर्णी
स्वप्निल श्रीरामवार
अहेरी तालुका प्रतिनिधि
मो न 8806516351

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त युवकांना पक्षाचे ध्येय गावखेड्यापर्यंत पोहचविण्यासाठी मदत करण्याचा दृष्टीने संघटन बांधणी आवश्यक आहे, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या संकल्पनेनुसार जबाबदारी पार पाडणाऱ्या युवकांना जिल्हा कार्यकारणीत संधी उपलब्ध करुन देण्यात यावे,त्या दृष्टीने सामाजिक आणि विद्यार्थी दशकातअतिदुर्गम क्षेत्रातील समस्यांची जाणीव असलेल्या अनुभवी युवक अशी जनसामान्यांत ओढक असणारा व्यक्ती म्हणून परिचित आहेत, त्यामुळे सर्वानुमते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटक जिल्हा महासचिव पदी कैलाश कोरेत यांची वर्णी लावण्यात आली, राष्ट्रवादी,युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, महिला विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम,माजी कार्याध्यक्ष बबलू हकीम,जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर, जिल्हा निरीक्षक जगदीश पंचबुद्धे,रायुका प्रदेश सरचिटणीस प्रा. रिंकू पापडकर ,प्रदेश सचिव कृपाल मेश्राम,रायुका जिल्हा अध्यक्ष लीलाधर भरडकर, युवक कार्याध्यक्षअनिल साधवानी,गडचिरोली शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय गोरडवार,यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट हाऊस गडचिरोली येथील आढावा बैठकीत नियुक्ती पत्र प्रधान करण्यात आले, निवडीचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, यांना दिले आहे……..!