पंतप्रधान मोदी, या प्रश्नांची देशाला प्रामाणिकपणे उत्तरे द्या, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे…
मीडियावार्ता: अलीकडे पार पडलेल्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाबद्दल देशभरातील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. स्वातंत्र्यदिन सारख्या बिगर राजकीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला राजकीय द्वेषाची किनार होती. भाषणामध्ये मात्र देशातील बेरोजगारी, वाढती हिंसा, धार्मिक द्वेष याबाबतची सत्यपरिस्थिती याचा त्यांनी अजिबात उल्लेख केला नाही असे नागरिकाचे म्हणणे आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर मुद्देसूद टीका केली आहे. मोदी, तुमचे फसवे, खोटेपणानी भरलेले भाषण माध्यमांना आवडले असेल, पण माझ्या मनात काही प्रश्न उठले आहेत, असे म्हणत सोशल मीडियावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहे.
१. एका श्वासात, तुम्ही स्वातंत्र्य योद्धा महात्मा गांधी, भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांची नावे घेतली. तुम्ही राष्ट्राला सांगू शकता का की ह्या पुरुषांचे विचार समुदायिक सद्भावना आणि धार्मिक सहिष्णुता देशात प्रस्थापित करण्याचे होते कि किंवा भारत देशाला हिंदू राष्ट्र बनवणे होते?
२. तुम्ही नैसर्गिक आपत्तीमध्ये संकट कोसळलेल्या सर्व कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त केली. पण भाजपाद्वारे समाजात पेरलेल्या द्वेषामुळे देशात झालेल्या जातीय भेदभाव आणि अत्याचार, मॉब लिंचिंग, साम्प्रदायिक हिंसा आणि लैंगिक हिंसेच्या विपत्तीमुळे दु:खी झालेल्या आणि प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रति कोण संवेदना व्यक्त करणार?
३. तुमच्या भाषणात अलीकडे झालेल्या नुह हिंसेचा कोणताही उल्लेख झाला नाही. तुम्ही ती घटना आधीच विसरले का किंवा तुमच्या पक्षांनी पाठीशी घातलेल्या गुंडांचा या घटनेनेत सहभाग असल्याने तुम्ही याबद्दल निवडक मौन ठेवले आहे का?
४. तुम्ही २०१४ भाषणांमधून आशा,आंगणवाडी कामगारांनासाठी केलेले योजनांची आश्वासने आजवर पूर्ण केली आहेत का?
५. भाजपा-आरएसएस भारताची धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि विविधतेतील एकता बदलू इच्छिते का? नाहीतर, हेगेडेवर यांनी आरएसएस सुरू का केले? गोलवलकरांनी भारताचे सेक्युलर संविधान संपूर्णपणे का नाकारले आणि सावरकरांचे नाव गांधींच्या हत्येच्या कटात का दिसून येते?
६. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला पुन्हा निवडून देण्यासाठी भाजपने देशभरात किती हत्या, विक्षोभक भाषणे, खोट्या बातम्या, दंगली घडवून आणण्याचे आयोजन केले आहे.
पंतप्रधान मोदी, या प्रश्नांची देशाला प्रामाणिकपणे उत्तरे द्या, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.