स्वातंत्र्य दिनानिमित्त न्यू प्रगतीच्य संचालिका संस्थापक अनिता खरात यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार

40

शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य – न्यू प्रगती शैक्षणिक संस्था

ठाणे: न्यू प्रगती शैक्षणिक संस्था (रजि.), ठाणे ही संस्था आदिवासी व वंचित घटकातील मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांद्वारे संस्था वंचित समाजघटकांच्या जीवनात प्रकाश पेरण्याचे काम करत आहे.

‎स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा तसेच बालवाडी शिक्षकांचा संचालिका संस्थापक अनिता खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुस्तके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले तर बालवाडी शिक्षिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. प्राप्ती प्रवीण झेंडे, सानिका महेश खरात, प्रणाली चंद्रकांत सोनवणे,कशिश जगदीश धांडोरे इत्यादी विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. सोबतच संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या हॅपी बालवाडी उपक्रमातील वर्गशिक्षिका दीक्षा कांबळे यांचा यानिमित्ताने सन्मान करण्यात आला. 

‎या कार्यक्रमात मा. नंदकुमार महाडिक सर यांनी उपस्थितांना “दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांनी पुढील वाटचाल कशी करावी, योग्य मार्ग कसा निवडावा” यावर अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी लाखमोलाचे ठरले.

‎तसेच मा.हिरामण गोरेगावकर सर यांनी शिक्षकांना 30 संच – पाट्या, वही, पट्टी, पेन्सिल, चेकिंग साहित्य इ. शैक्षणिक साधनसामग्रीचे सहाय्य केले. संस्थेच्या वतीने त्यांच्या या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

‎कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी मा. विजय काळे सर, इंजि. महेश गडांकुश सर, मा. सुनिता सोनवणे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे व मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह व प्रेरणा लाभली