*आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांना ‘साम’ टी व्ही कडून आरोग्य संपदा सन्मान २०२१ पुरस्कार प्रदान*

प्रतिनिधी : गेले दोन वर्षे सतत आपल्या कुटूंबियांपासून दूर राहून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून आपल्या प्राणाची बाजी लावून कोविड काळात केलेल्या सेवेबद्दल ‘साम’ टी व्ही ने आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना आरोग्य संपदा सन्मान २०२१ पुरस्काराने सन्मानित केले.यामध्ये जावळीचे सुपुत्र,व विजय मल्टिस्पेसिलीटी हॉस्पिटल चे विश्वस्त श्री मिलिंद शिंदे यांना सुद्धा सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सदर पुरस्कार राज्याचे आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पदमश्री डॉ. तात्याराव लहाने,प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला.
त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.