पंतप्रधानांच्या वाढदिवसा निमित्त काँग्रेसने साजरा केला राष्ट्रीय बेरोजगार दिवस

पंकज रामटेके
घुग्घुस शहर प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
घुग्घुस :- देशाला अच्छे दिनाचे गाजर दाखवून खोट्या विकासाचा फुगा फुगवून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी शासनाच्या काळात गेल्या पंचेचाळीस वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी देशाला पहावी लागली आजघडीला देशातील उच्चशिक्षित युवकांचा बेरोजगारी दर हे साठ टकय्यावर आलेला आहे.
शासकीय नोकरी आता केवळ दिव्य स्वप्नच झालेला आहे. केंद्रीय सत्तेने मागील सत्तर वर्षात देशाने कमविलेली शासकीय संपत्ती विकण्यासाठी नियोजनबद्ध योजना राबविण्यात येत आहे. देशात बेरोजगारांचे लोंढेच लोंढे वाढत असून गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत बेरोजगार आणि बेरोजगारच दिसत आहे. रोजगारा अभावी युवकांत प्रचंड नैराश्य पसरत असून युवकांच्या आत्महत्येत प्रचंड वाढ झाली आहे. देशातील युवकांना रोजगार देण्याचा खोटा आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला.
देशातील युवकांनी “पकोडे” व्यवसाय शुरू करावा असे आवाहन पंतप्रधानाने केले होते. मात्र वाढत्या महागाईत स्वयंपाक गॅस रिफिल करणे सर्वसामान्य नागरिकांना कठीण होत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यातर्फे प्रतिकात्मक “चहा” आणि भज्याची दुकान लावण्यात आली व नागरिकांना चहा व भजी देण्यात आली.
सदर आंदोलन हे पानी टंकी परिसरात करण्यात आले याप्रसंगी शहर अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, युवक जिल्हा सचिव सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, नुरुल सिद्दिकी, इर्शाद कुरेशी, रोशन दंतलवार, विशाल मादर, रोहित डाकूर, सुकमार गुंडेटी, बालकिशन कुळसंगे, देव भंडारी, अंकुश सपाटे, शुभम घोडके, गोविंद, कपिल गोगला, सुनील पाटील, अमित सावरकर, जुबेर शेख, वस्सी शेख, कुशल गोगला, तर महिला काँग्रेसचे सौ.संगीता बोबडे, सौ.पुष्पा नक्षीने, संध्या मंडल, अमिना बेगम, दुर्गा पाटील, सौ.माधुरी ठाकरे, सौ.सरिता गौरकार, संगीता कांबळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.