हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा समर्पण सप्ताहाचे आयोजन.

✒मुकेश चौधरी ✒
उपसंपादक मिडिया वार्ता न्युज
7507130263
हिंगणघाट,दि.17 सप्टेंबर:- भारताचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस सेवा समर्पण सप्ताह म्हणून आमदार समीरभाऊ कुणावर यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समीर भाऊ कुणावर यांनी माननीय प्रधानमंत्री यांनी गेल्या सात वर्षात जनतेची सेवा विविध योजनांच्या माध्यमातून थेट शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचविली तसेच त्यांचे समर्पणाची चर्चा संपूर्ण जगात चर्चिल्या जात आहे अशा महान तपस्वी व्यक्तीच्या वाढदिवसाच्या निमित्त गेल्या सात वर्षात जनधन योजना प्रधानमंत्री आवास योजना उज्वला योजना आयुष्यमान भारत योजना शेतकरी सन्मान योजना मुद्रा योजना यासारख्या अनेक योजनांवर आमदार समीर भाऊ कुणावर यांनी प्रकाश टाकला. तसेच प्रधानमंत्री यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे सर्व जगभर कौतुक होत असल्याचे सांगताना काश्मीरचे 360 कलम असो देश सुरक्षा सोबत कुठलीही तडजोड न करण्याच्या प्रधानमंत्री यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा सेवा समर्पण सप्ताह 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर विधानसभा मतदार संघात साजरा करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, जिल्हा परिषद गट नेता नितीन मडावी, जिल्हा परिषद सभापती मृणालताई माटे, जिल्हा परिषद सभापती माधवराव चंदनखेडे, भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश भाऊ ठाकूर, तालुका अध्यक्ष संजय डेहणे, आकाश पोहाणे, नगराध्यक्ष बबीताताई तूमाने, सभापती शारदाताई आंबटकर, सौ. सुरेखाताई टिपले, ओम प्रकाश राठी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष गंगाधरराव कोल्हे, महिला मोर्चा अध्यक्ष अनिताताई मावळे, सौ अरुणा ताई हेमके, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष बिस्मिल्ला खान, वामन चंदनखेडे, तुषार आंबटकर, अंकुश खुरपडे, माजी नगराध्यक्ष गजुभाऊ राऊत, शीलाताई सोनारे, बालु भाऊ इंगोले, सुनील भाऊ डोंगरे, शहर युवा मोर्चा शहर अध्यक्ष सोनू भाऊ पांडे, गौरव तांबोळी, किशोर भाऊ नेवल, शिवाजी आखाडे, योगेश बोंडे, विलास अंबरवेले , रवी रोहणकर, विनोद विटाळे, पंकज देशपांडे, नरेंद्र पोफळे, भाग्येश देशमुख ,स्नेहल करोडे, नितीन वाघ, सुरेश वखरे, मधुकर महाजन सुनील सरोदे, दामू माटे, डॉक्टर विजय पर्वत, सुनील डूकरे,भोजराज साठवणे, सारिका ताई उभाटे भाजपाचे नगरसेवक – नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शक्ती केंद्रप्रमुख सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुभाष जी कुंटेवार यांनी केले. आभार प्रदर्शन आकाश पोहाणे यांनी केले.