उभ्या ट्रकला इनोवा धडकली, दोघे जागीच ठार

70

उभ्या ट्रकला इनोवा धडकली, दोघे जागीच ठार

उभ्या ट्रकला इनोवा धडकली, दोघे जागीच ठार

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀8554920002🪀

औरंगाबाद – नागपूर महामार्गावर • जऊळका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील उमरदरीतील उभ्या असलेल्या कंटेनरला माघून येणाऱ्या इनोव्हा करने धडक दिल्याने कारमधील दोन पुरुष ठार झाले असून दोन जखमी झाले आहे. घटना स्थळी तीन वाहने अपघातगस्त झाली आहे. मृतकांना व जखमींना मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. नागपूर औरंगाबाद महामार्गावरील जल का पोलीस स्टेशन हद्दीतील उमरदरी फाट्या जवळ एम एच ३४ बी जी ७१०६ हा कंटेनर नादुरुस्त अवस्थेत महामार्ग लगत उभा होता, आज शुक्रवार रोजी सकाळी अंदाजे ३ / ४५ च्यासुमारास इनोव्हा कार क्र. एम. एच. १४ इ एच २३१८ नागपूर कडे जात असताना उभ्या असलेल्या कंटेनर च्या अंदाज न आल्यामुळे मागच्या बाजूने इनोव्हा जाऊन धडकली, दिलेल्या धडकेत् इनोव्हा कार मधील सुभाष जयवंत हिंगे अंदाजे वय वर्ष ३४ व संपत दगडू शिंदे अंदाजे वय वर्ष ३३ राडवडी राजगुरुनगर ता. खेड जी. पुणे हे दोन जन जागीच ठार झाले तर अमोल भालचंद्र खंडागळे संदीप विष्णू शिंदे हे जखमी झाल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे अपघातात इनोव्हा कार पूर्णतः एक बाजूचा चुराडा झाला आहे तर डिझायर चे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही मृतकांनाग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे पाठविण्यात आले असून अपघात ग्रस्त वाहने बाजूला करून रस्त्याची एक साईड रहदारीस मोकळी करण्यात आली असून वाहतूक सुरळीत चालू आहे. तर रात्री च्या सुमारास आणखी काही वाहने उभ्या असलेल्या कंटेनर मुळे अपघात ग्रस्त झाल्याची माहिती आहे मात्र ती वाहने घटना स्थळावरून पसार झाले असून स्विफ्ट डिझायर क्र. एम्. पी. ०९ सी यू ८०२१ ही गाडी अपघातग्रस्त घटना स्थळी आहे. पुढील तपास ज उ ल का पोलीस स्टेशन चे ठाणेदार अजिनाथ मोरे याच्या मार्ग दर्शना मध्ये पोलीस करित आहे..✍