राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्रच अव्वल, ३७ व्या नेशनल गेम्ससाठी महाराष्ट्राची निवड

100

१० व्या सिनिअर राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत पुरुषांच्या गटात महाराष्ट्र विजेता तर महिलांमध्ये हरियाणाचा संघ विजेता ; गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या नेशनल गेम्स साठी निवड…

महाराष्ट्राचा विजेतेपद स्वीकारताना पुरुष संघ

रत्नाकर पाटील

अलिबाग प्रतिनिधी

अॅम्युचअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने, हरियाणा लगोरी संघटनेच्या वतीने दहावी सिनियर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद नुकतीच प्रथम इंटरनेशनल स्कूल रेवाड़ी हरियाणा येथे भव्य दिव्य स्वरूपात पार पडली. या स्पर्धेत भारतातील २४ राज्यातून ६५० खेळाडू, २४ मुलांचे व २० मुलींचे संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचे उदघाटन कोसलीचे आमदार लक्ष्मणसिंह यादव, सोनीपत जिला भाजपा अध्यक्ष तीर्थ राणा, पूर्व जिला परिषद अजय पाटोदा, भाजपा जिला उपाध्यक्ष अजय कांतीवाला, सरपंच विकास सांगवाल, लगोरी संघटनेचे सचिव ॲड.प्रिया गुरव, सह सचिव तुषार जाधव,हरियाणा लगोरी संघटनेचे सचिव जयवीर डूडी यांच्या हस्ते लगोरीचे जनक स्व.संतोष गुरव सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत दीप प्रज्वलन करून तसेच लगोरी फोडून करण्यात आले. उदघाटनाप्रसंगी लगोरी खेळाच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी महाराष्ट्रातील लगोरीचे जनक, क्रीडारत्न स्व. संतोष गुरव यांनी तन मन धन अर्पून प्रसार केल्यामुळे भारतातील सर्व राज्यांसह जगभरातील तीस देशांमध्ये आज तो मोठ्या प्रमाणात खेळला जात असून गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या नेशनल गेम्स साठी भारतीय ऑलम्पिक संघटनेने लगोरी खेळ समाविष्ट केल्याने त्यांनी ठरविलेले स्वप्न साकार होत चालले असल्याने त्यांच्या आत्म्यास शांती लाभली असेल त्यांचे लगोरीतील कार्य संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार अनेक वक्त्यांनी यावेळी काढले. हरियाणा ऑलम्पिक संघटनेची व हरियाणा क्रीडा सरकारच्या मान्यतेसाठी त्वरित विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही आ.लक्ष्मणसिंह यांनी दिले

       स्पर्धेत पुरुषांच्या गटात महाराष्ट्र संघाला विजेते पद, उपविजेतेपद गोवा, तर तृतीय स्थान पॉण्डेचेरी व आसाम संघाला मिळाले. 

महिलांमध्ये हरियाणा संघाने सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपद मिळविले. उपविजेतेपद आसाम, तर तृतीय स्थान गोवा व झारखंड संघाला मिळाले. मुलांमध्ये बेस्ट प्लेयर सार्थक कवळेकर तर मुलींमध्ये हरियाणातील काजल ह्यांनी मिळवले.

महिलांमध्ये हरियाणाचा संघ विजेतेपद स्वीकारताना

टार्गेट लगोरी प्रकारात राजस्थान संघाला प्रथम, कर्नाटक संघाला द्वितीय स्थान, तर तृतीय स्थान चेन्नई संघाने मिळवले तर मिक्स डबल मध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपद तामिळनाडू संघाने मिळविले.

या स्पर्धेतून क्‍वार्टर फाइनल मधील टॉप आठ मधील मुले व मुलींचे संघ यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या नेशनल गेम्स मध्ये सहभागी होणार आहेत.

बक्षीस वितरण समारंभ शाळेचे संचालक उत्तमसिंग यादव, भारतीय लगोरी संघटनेचे अध्यक्ष,शिवछत्रपती पुरस्कार विजेते संदीप गुरव, प्रथम इंटरनेशनल शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा यादव, संचालक हिमांशू यादव, हरियाणा लगोरी संघटनेचे सचिव जयवीर दुडी,सहसचिव रवींद्र कुमार,भारतीय लगोरी संघटनेचे तांत्रिक मार्गदर्शक भरत गुरव, तुषार जाधव,ऑफिशियल राजेंद्र पाटील, रवी,मनोज,पवन,रंदिर आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून भरत गुरव, तन्वेश वेंगूलेंकर,संतोष नाईक यांनी, तर सहपंच पंच ब्रजराज शेखावत, पुनीत, नितीन पार्सेकर,संदीप पेडणेकर यांनी काम पाहिले. या राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत विजेतेपद मिळविलेले महाराष्ट्रातील विजयी खेळाडूंची नावे खालील प्रमाणे — हेरंब विश्वनाथ गर्दे, करण अरविंद गौड,ओम नारायण राऊत, रोहन महादेव काळे, भुषण संतोष राऊत, देवेश अशोकराव महाकाळ, प्रियांशु गोपाळ खोडके, बरकत मुफीझ शेख,विशाल धर्मेंद्र निशाद,सुशांत का.पटेल, देवेश महाकाळ रूषब,राज सुभाष गुप्ता,रोहित रवींद्र तुपारे,भारत चंद्रकांत कुथे, सिद्धांत संतोष गुरव, ऋषभ लक्ष्मण खांडेकर संघ प्रशिक्षक राजेंद्र पाटील,संघ व्यवस्थापक अंजली शर्मा तर मिक्स डबल या प्रकारात उज्वला वाघमाते,प्रतीक्षा डव्हळे, वैष्णवी कांबळे, तपस्वी नौगांण ,शर्वरी कामठे, नम्रता वाघ,प्रणिता सरोदे, श्रुती मोरे,धवल तेलंगे,अनुप देशमुख,सिद्धांत गुरव, अनिकेत अडोले, हेरंब गर्दे,प्रतीक राजगुरे यांनी विजेतेपद मिळवले या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या नेशनल गेम्स साठी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र लगोरी संघटनेचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.