माजी विद्यार्थ्यांनी "ऋणानुबंध" म्हणून "गुरुजनांचा सन्मान" करून मोठ्या उत्साहात सोहळा संपन्न

माजी विद्यार्थ्यांनी “ऋणानुबंध” म्हणून “गुरुजनांचा सन्मान” करून मोठ्या उत्साहात सोहळा संपन्न

माजी विद्यार्थ्यांनी "ऋणानुबंध" म्हणून "गुरुजनांचा सन्मान" करून मोठ्या उत्साहात सोहळा संपन्न

गुणवंत कांबळे
✍️मुंबई प्रतिनिधी✍️
मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई- सायन (पुर्व) येथील सलग इयत्ता दहावी शंभर टक्के निकाल काढणारी सुप्रसिध्द ‘ज्ञानविकास नाईट हायस्कुल’ शाळेमध्ये वर्ष २०२१-२०२२ आणि वर्ष २०२२-२०२३ दरम्यान दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून शिक्षणाची दिशा भरकटलेल्यांना उच्च श्रेणी मध्ये उत्तीर्ण करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या गुरुजनांचा सन्मान म्हणून शनिवार दि. १६ सप्टें. २०२३ रोजी ‘ऋणानुबंध सोहळा’ आयोजित करण्यात आला.

प्रामुख्याने रात्रशाळेच्या होतकरू विद्यार्थ्यांना घडवण्यात आपला मौल्यवान वेळ आणि ज्ञान खर्ची करणारे गणित विषयतज्ञ फडतरे सर, शुध्द स्वरुपात मराठी भाषा शिकविणा-या कामिनी केंद्रे मॅडम आणि सहज सोप्या भाषेत इंग्रजी विषय कळेल आणि बोलण्यासाठी सुलभ पध्दतशीर इंग्रजी शिकविणारे इंग्रजी विषयतज्ञ सतिश नागमुडे सर हे शासनाच्या आदेशानुसार दुस-या शाळेत बदली झाल्याने सर्व माजी विद्यार्थ्यांनी हा सोहळा आयोजित केला होता.

ह्या सोहळ्यात ‘ज्ञानविकास नाईट हायस्कुल’ चे सर्वांचे आदरणीय प्रिन्सिपल परदेशी सर, नव्याने बदली होऊन आलेले सुर्यवंशी सर, वाघ सर, पाटील सर यांच्यासह मुंबई च्या सर्व रात्रशाळेला भक्कम पाठबळ देणा-या मासूम संस्था चे प्रतिनिधी सुरवसे सर, विकास सर तसेच, समाजसेविका दक्षा कोळी आणि ब्राईट फ्युचर संस्थेच्या अश्विनी मॅडम यांच्यासह ह्या वर्षातील वर्ष २०२३-२०२४ दरम्यान शिक्षण घेत असलेले इयत्ता आठवी, नववी आणि दहावी च्या बहु उपस्थितीने हा सोहळा विशेष ठरला.

बदली होऊन दुस-या शाळेत गेलेले माजी शिक्षक फडतरे सर यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना संबोधन केले. सतिश नागमुडे सर यांनी विद्यार्थी घडवित असताना होणारे मजेदार किस्से सांगत सर्वांना खदखदून हसवितानाच जीवनाचे वास्तविकता समोर मांडत विद्यार्थ्यांना मौल्यवान सल्ला दिला तर केंद्रे मॅडम यांनी शाळेबरोबरचा आपला सहवास सांगताना गहिवरून गेल्या.

त्यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थी प्रतिनिधींनी आपापले अनुभव सांगताना शाळेत प्रवेश घेण्याआधी, परिक्षा देण्यापर्यंत आणि नंतर उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर झालेला विचारांचा बदलाचा अनुभव व्यक्त करत होते.

मासूम संस्थेचे प्रतिनिधी विकास सर यांनी आजीमाजी विद्यार्थ्यांना संबोधन करताना शाळेप्रती कर्तव्याची जाणिव करुन देत शिक्षणापासून वंचित असलेल्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करून सामाजिक दायित्व अवलंबून ज्ञानविकास नाईट हायस्कुल मध्ये अधिकाधिक पटसंख्या वाढविण्याची गुरु दक्षिणा म्हणून शाळेसाठी द्यावे, असा संदेश दिला.

शेवटी ज्ञानविकास नाईट हायस्कुल चे आधारस्तंभ प्रिन्सिपल परदेशी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण पूढे चालू ठेवावे आणि स्वतः ची स्वाभिमानी ओळख निर्माण करण्याचे मौलिक मार्गदर्शन केले.

त्यानंतर पद्मश्री अण्णाभाऊ जाधव शैक्षणिक संस्थेकडून विशेष शैक्षणिक कार्यासाठी निवड झालेल्या माजी शिक्षक फडतरे सर, सतिश नागमुडे सर आणि कामिनी केंद्रे मॅडम यांना सन्मान चिन्ह आणि गौरव पत्र देऊन प्रिन्सिपल सरांकडून सन्मानित करण्यात आले तर
मासूम संस्थेकडून ‘वर्ष २०२२-२०२३’ दरम्यान इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी शाळेतून पहिला, दुसरा आणि तिसरा नंबरने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रिन्सिपल सरांच्या हस्ते बहाल करण्यात आले.

सोहळ्याच्या शेवटी ‘वर्ष २०२१-२०२२’ च्या आणि ‘वर्ष २०२२-२०२३’ च्या प्रत्येक बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून माजी शिक्षकांना आठवण म्हणुन आकर्षक स्मृती चिन्ह दिले तर शाळेच्या प्रिन्सिपल परदेशी सर,मासूम संस्थेचे प्रतिनिधी सुरवसे सर, समाजसेविका दक्षा कोळी आणि ब्राईट फ्युचर संस्थेच्या अश्विनी मॅडम
यांच्यासह शाळेसाठी विशेष भेटवस्तु देऊन ऋणानुबंध राखून असा हा आठवणीत राहणारा अद्भुत “ऋणानुबंध सोहळा”संपन्न झाला.

ह्यातील वैशिष्टपुर्ण गोष्ट म्हणजे माजी शिक्षक फडतरे सर, सतिश नागमुडे सर, कामिनी केंद्रे मॅडम यांच्यासह प्रिन्सिपल परदेशी सर हे प्रत्येक विद्यार्थ्यांची मासिक फी स्वतः च्या पगारातून भरत असताना दहावी विद्यार्थ्यांच्या रविवारी विशेष वर्गासाठी अल्पोपहार आणि जेवण स्वतः च्या खिशातून खर्च करत होते.

असे आदर्श शिक्षक असतील तर ती शाळा नेहमी नुसत्या शिक्षणाने नव्हे तर आदर्श कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून विद्यार्थी घडेल. अशा अज्ञानरुपी दगडांना शैक्षणिक पैलू पाडत उत्कृष्ट यशस्वी विद्यार्थी घडविणारे मानवी विचारांचे शिल्पकाररुपी शिक्षकांना मानाचा सन्मान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here