धरणगाव नगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक
गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न
डी. एस.मोरे
धरणगाव तालुका प्रतिनिधी मो.
98232 30361
धरणगाव- सार्वजानिक सण उत्सव साजरे करताना पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी व्हावे यासाठी शासनाकडून पर्यावरणपूरक सण-उत्सव साजरे करण्यात यावे असे आवाहन वारंवार करण्यात येत असते. त्यानुसार धरणगाव नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण- २०२४ आणि माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरण पूरक गणपती मूर्ती निर्मितीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये शहरातील विविध विद्यायातील जवळपास २०० विद्यार्थी,विद्यार्थिनी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यशाळेसाठी आर्किटेक्ट शुभम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या सुरुवातीस श्री सोनवणे यांचे स्वागत न.पा.कार्यालयाचे अधिक्षक संजय मिसर यांनी केले व त्यानंतर कार्यशाळा सुरू झाली. कार्यशाळा सुरू असतांना मुख्याधिकारी श्री विकास नवाळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी या कार्यशाळेत बनविलेली गणपती मूर्ती आपापल्या घरी न्यावी आणि गणेशोत्सवात याच मूर्तीची स्थापना करावी. आपल्या घरातील व शहरातील नागरिकांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सांगावे असे आवाहन केले. कार्यशाळेच्या शेवटी सहभागी झालेल्या प्रशिक्षणांर्थींंमधून बनविण्यात आलेल्या गणपती मूर्ती मधून उत्कृष्ट मूर्ती बनविणाऱ्यांना बक्षीसे व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करनिरिक्षक प्रणव पाटील यांनी केले तर सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक रवींद्र गांगुर्डे, शहर समन्वयक निलेश वाणी, सहा.प्रकल्प अधिकारी तुषार सोनार,PMAY अभियंता विक्रांत चौधरी, दिपक वाघमारे, संजय शुक्ला, गोपाल चौधरी, रविकांत वाघमारे यांचेसह सर्व आरोग्य विभाग व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.नागरिकांनी सुध्दा पर्यावरणपूरक पद्धतीने आगामी गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन न.पा. प्रशासनामार्फत करण्यात आले.
आभारप्रदर्शन निलेश वाणी यांनी केले.