लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात मेरी मिट्टी, मेरा देश अंतर्गत “अमृत कलशचे” उद्घाटन संपन्न…
सुनिल जाबर
जव्हार प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालय मोखाडा मध्ये नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे नावीन्य पूर्ण कार्यक्रम घेतले जातात त्यातीलसच एक राष्ट्रीय सेवा योजना उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सेल्फी विथ माय सॉईल या विषयावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हा राष्ट्रीय उपक्रम रयत शिक्षण संस्थेचे, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत अमृत कलशाचे उद्घाटन करण्यात आले.
‘मातीस नमन, वीरांस वंदन’ देणारा अमृत कलश महाविद्यालयात ठेवण्यात आला व महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी व एन.एस.एस. च्या स्वयंसेवकांनी आपल्या गावातून आणलेली मूठभर माटी अमृत कलशामध्ये टाकावी असे आव्हान राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर.व्हंडे यांनी विद्यार्थ्यांना केले व उपस्थित सर्वांना या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस. ई.सैंदनशिव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान केले. प्रत्येक गावातील व तालुक्यातील अमृत कलश संकलन मुंबई येथे एकत्रित जमा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आभार एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. वाय. एच. उलवेकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. जी. मेंगाळ,डॉ. एस. एच. जाधव, सर्व प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी तसेच शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.