गावठी कट्टा घेऊन दहशत माजवणारा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या जाळ्यात

गावठी कट्टा घेऊन दहशत माजवणारा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या जाळ्यात

गावठी कट्टा घेऊन दहशत माजवणारा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या जाळ्यात

✍️विशाल सुरवाडे ✍️
जळगाव ब्युरो चीफ
📱9595329191📱

*जळगाव*- तालुक्यातील कानळदा येथील सुहास भरत बावीस्कर,( वय ३८, रा. कानळदा ता.जि.जळगाव) गावठी कट्टा घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरत असताना स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या पथकास गुप्त बातमीदार कडून बातमी मिळाली की, सुहास बाविस्कर हा त्याच्या कब्जात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने देवगाव तालुका पारोळा येथे आला आहे. श्री.बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री दत्तात्रय पोटे, श्रेपोउनि श्री अनिल जाधव, पोह दिपक माळी, रविंद्र पाटील, विलेश सोनवणे, हेमंत पाटील, प्रदिप चवरे सर्व नेम. स्थागुशा जळगाव अशांचे पथक तयार करण्यात आले होते.
त्यानंतर त्यांच्या पथकाने देवगाव शिवार ता. पारोळा येथे जावून मिळालेल्या बातमीची खात्री करून सुहास बावीस्कर यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुहास बावीस्कर रा. कानळदा ता.जि.जळगाव असे सांगीतले त्यावरून त्याचे अंगझडती घेता त्याचे ताब्यात १ गावठी बनावटीची पिस्टल व २ जिवंत काडतुस मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द पारोळा पो. स्टे. येथे गुन्हा दाखल करून त्याची वैद्यकिय तपासणी करून त्यास सदर गुन्ह्याचे पुढील तपासकामी पारोळा पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here