भिवंडी महानगरपालिकेच्यावतीने बुध्दीबळ स्पर्धाचे आयोजन शालेय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन*

11

*भिवंडी महानगरपालिकेच्यावतीने बुध्दीबळ स्पर्धाचे आयोजन शालेय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन*

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076

राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे संचलित भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने भिवंडी मनपा जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन स्व. राजय्या गाजेंगी सभागृहात कोंबडपाडा भिवंडी येथे करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन महानगरपालिकेचे मा.प्रशासक तथा आयुक्त श्री.अनमोल सागर (भा.प्र.से) यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत सहभागी खेळाडूंना यांना मार्गदर्शन करताना मा.प्रशासक तथा आयुक्त श्री. अनमोल सागर (भा.प्र.से) यांनी नमुद केले की, कोणताही खेळ हा एकाग्रतेने खेळावा. बुद्धिबळात जरी बुद्धीचा वापर होत असला तरी आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे, बुद्धिबळातून आपण मनाची एकाग्रता साधणे आवश्यक आहे. खेळाडूंमध्ये हार जीत होणे अपेक्षित आहे, पण खेळात सहभागी होणे हेच सगळ्यात महत्त्वाचे आहे असे देखील आयुक्तांनी नमूद केले. या प्रसंगी व्यासपीठावर मनपा क्रिडा विभागाचे मा. उपायुक्त श्री. विक्रम दराडे, शिक्षण विभागाचे मा. उपायुक्त श्री. बाळकृष्ण क्षिरसागर, क्रिडा विभाग प्रमुख श्री. मिलिंद पळसुले, क्रीडा अधिकारी श्री. शरद कलावंत, ठाणे जिल्हा बुद्धिवळ संघटनेचे मोहित लाडे व अन्य बुद्धिबळ क्रीडापटू, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बुद्धिबळ स्पर्धेत मनपाच्या क्षेत्रातील एकूण 40 शाळेमधून 550 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.तसेच सन 2025-2026 च्या शालेय क्रीडा स्पर्धेत सर्व शाळांनी सहभाग घेण्याचे आवाहन क्रीडा उपयुक्त विक्रम दराडे यांनी केले.