Home latest News मुख्यमंत्री समृद्धी योजनेअंतर्गत पोलादपूरमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा संपन्न
मुख्यमंत्री समृद्धी योजनेअंतर्गत पोलादपूरमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा संपन्न
सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर (१७ सप्टेंबर): महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्धी योजना अभियानांतर्गत आज पोलादपूर पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम, आणि विकास कामांची सविस्तर माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
ग्रामीण भागातील शासनाच्या वतीने ग्रामपंचायतच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), रोजगार हमी योजना यासह अन्य योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आली. या अभियानाचा मुख्य घटक म्हणजे 1 सुशासन युक्त पंचायत ,2 सक्षम पंचायत,3 जलसमृद्ध स्वच्छ हरित गाव निर्माण करणे,4 मनरेगा व इतर योजनेचे अभिसरण करणे, 5 गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे 6 उपजीविका विकास सामाजिक न्याय, 7 लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे असे उपक्रम कालावधी १७ सप्टेंबरपासून सुरू होऊन ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असणार आहे.
ग्रामसभा ही पंचायत समिती गटविकास अधिकारी सौ. दीप्ती गाट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच स्थानिक अधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. गावातील ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, नवतरुण यांचीही उपस्थिती उल्लेखनीय होती.
या ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्धी योजनेअंतर्गत होणाऱ्या उपक्रमांचे नियोजन, कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री समृद्धीसमित्या व उपसमित्यांची स्थापना, तसेच गावच्या सर्वांगीण विकासासाठी करावयाच्या प्रयत्नांवर भर देण्यात आला.
या उपक्रमामुळे गावपातळीवर योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती वाढण्यास हातभार लागणार आहे, असे मत यावेळी अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले.