स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाला प्रारंभ

18

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाला प्रारंभ

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098

नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाचा बुधवारी (ता.१७) नागपूर शहरात नागपूर महानगरपालिकेच्या नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून शुभारंभ झाला. इंदौर, मध्य प्रदेश येथे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ झाला. त्याचे थेट प्रक्षेपण आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आले.

मनपाच्या नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये याप्रसंगी महराष्ट्र अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते श्री. तानाजी वनवे, माजी उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, नेहरूनगर झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन पवाने, नंदनवन आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेयस खेमुका, माधव नेत्रालयचे संचालक श्री. सुधाकर गोखले, श्री. किशोर कुंभार, श्री. राजेंद्र भोयर आदी उपस्थित होते.

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत असलेल्या या अभियाना अंतर्गत मनपाच्या १६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येतील.