प्रहारचा प्रयत्नाने झाला माझा घरातील अंधार दूर.
वर्धा:- रविंद्र रामभाऊ मुंडाले रा. सिंधी रेल्वे त. सेलू जि. वर्धा येथील शेतमजूर आहे मी मागील 7 वर्षांपासून सिंधी रेल्वे येथे झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करत होतो पण मागील 2 वर्षांपूर्वी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यामुळे माझी व इतरांची झोपडी कोणतेही ही पर्यायी व्यवस्था न करता तोडले गेली माझा संसार उघड्यावर पडला होता दोन मुलं शिक्षणाची आहे आता जायचं कुठं रोज मजुरी करून संसार चालत होता किराया पण देऊ शकत नव्हतो नंतर मी रेल्वे स्टेशन रोड कडील वासुदेव प्रेसिंग जिनिंग समोरील खोल खड्ड्यांमध्ये माती भरून झोपडी बांधून राहत आहो मी इलेक्ट्रिक लाईन करिता लागणारे कागदपत्रे माहितीकरिता महावितरण कार्यालय सिंधी रेल्वे येथे भेट दिली त्यांनी मला कागदपत्रे लिहून दिली मी नगरपरिषद सिंधी रेल्वे येथे भेट दिली पूर्ण समस्या समजून सांगितली आम्ही सहा ते नऊ कुटुंब आमचे मुलं शिक्षणाची आहे त्याकरिता इलेक्ट्रिक लाईन अत्यंत गरज आहे त्याकरिता टॅक्स पावती व इलेक्ट्रिक लाईन करिता ना हरकत प्रमाणपत्र ची मागणी केली असता नगर परिषद ने टॅक्स लावण्यास नकार दिला. नंतर मी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील कार्यसम्राट आमदार मा. समीरभाऊ कुणावार यांच्या निवासस्थानी गेलो त्यांना पूर्ण समस्या समजून सांगितली त्यांनी आश्वासन दिले होते की तुम्हाला घरगुती विद्युत लाईन मिळवून जाईल त्यांची सत्ता सिंधी रेल्वे नगर परिषद मध्ये असून सुद्धा इलेक्ट्रिक लाइन करिता ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही असे करता दीड वर्ष निघून गेले मुलांचा विचार येत होता मुलं दिव्यांमध्ये अभ्यास करायचे.
नंतर मला राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांची आठवण आली सामान्य ते सामान्य जनतेचे काम करणारा लोकनायक कर्मवीर बच्चुभाऊ आहे मी सिंधी रेल्वे येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे सिंधी रेल्वे शहरप्रमुख सुरजभाऊ आष्टनकर यांना भेटलो पूर्ण समस्या सांगितली त्यांनी दुसऱ्या दिवशी पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे ,वर्धा जिल्हा प्रमुख जयंतभाऊ तिजारे, जिल्हा उपप्रमुख मंगलभाऊ सोनटक्के , सेलू तालुका प्रमुख हंसराजभाऊ बेलखोडे ,सिंधी रेल्वे उपशहर प्रमुख सचिनभाऊ पेटकर यांना घेऊन माझ्या घरी आले व विदर्भ प्रमुख मा गजूभाऊ यांनी मला तेव्हाच शब्द दिला की तुम्हाला 15 दिवसाच्या आत घरगुती इलेक्ट्रिक लाईन मिळून जाईल हे ऐकून मला खूप आनंद झाला त्यांनी तेव्हाच महावितरण कार्यालय सिंदी रेल्वे अभियंता श्री खेडकर सर यांना फोन करून अडचण समजावून सांगितली आणि अतिक्रमण जागेवर असलेल्या कुटुंबाला इलेक्ट्रिक लाईन सन 2016 चे शासन परिपत्रक सांगितले आणि समोरची कार्यवाही सुरु झाली मी फार्म भरणे डिमांड भरणे याकरिता शहरप्रमुख सुरजभाऊ आष्टनकर यांना घेऊन पूर्ण काम केले त्यांनी मला परिपूर्ण सहकार्य केले.
दि 16/10/2020 रोज शुक्रवार ला माझ्या घरी इलेक्ट्रिक लाईन आली व इतर कुटुंबा ची प्रक्रिया सुरू आहे मी अत्यंत आनंदी झालो खरच प्रहार हे समाजकार्य तून मोठे झाले आहे धन्य मा ना. बच्चुभाऊ कडू सर्वसामान्यांचे प्रश्न आपले समजून मार्गी लावतात त्याचप्रमाणे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा तेच काम करत आहे ,मी पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजूभाऊ कुबडे हे खरंच आमदार पेक्षा कमी नाही, मला सहकार्य करणारे सर्वांचे मी आभार मानतो आणि मी कधी प्रहारची साथ सोडणार नाही धन्यवाद.