नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेला आरोप खोटा आहे ! छोटा राजनच्या भावाचे स्पष्टीकरण !

संतोष मोरे

इंदापूर प्रतिनिधी 

मो: 7744812027

 इंदापूर माणगांव :-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली होती. तसेच आपल्याला मारण्यासाठी शकीलला, छोटा राजनला सुपारी दिली होती असा गंभीर आरोप राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. 

 दरम्यान नारायण राणे यांच्या या आरोपाचे छोटा राजन उर्फ नाना यांचे मामेभाऊ ऍड. हेमचंद्रदादा मोरे यांनी खंडन केले. नारायण राणे यांनी छोटा राजन बाबत केलेल्या वक्तव्याचा वास्तविक काहीही संबंध नाही. त्यांनी केलेल्या विधानाला काही ही आधार नाही. जर असे कृत्य झाले असते. तर नारायण राणे यांनी त्यावेळी तक्रार दाखल केली असती. मात्र अशी कोणती ही तक्रार दाखल झालेली नाही. त्याच बरोबर छोटा राजन वर जे आरोप आहेत. त्याचे खटले सध्या न्यायालयात सुरू आहेत. असे असताना राजकारणासाठी कृपया कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने छोटा राजन यांच्या नावाचा वापर करून एक मेकांना लक्ष करण्याचा प्रयत्न करू नये. अशी विनंती ऍड. हेमचंद्रदादा मोरे यांनी केली आहे. 

उद्धवजी ठाकरेंवर आरोप:-

नारायण राणे म्हणाले होते. की मला मारण्यासाठी शकील, छोटा राजन यांना सुपारी दिली होती. पण तुझ्या सुपाऱ्या ही काही काम करू शकल्या नाही. शकीलला दिली. छोटा राजनला दिली. सुभाष शिंगला दिली नारायण रानेला मारा.

 काय झालं मारलं का कोणी. कोणी आहे का जिवंत आज. उद्धव ठाकरे मी तुला पुरून उरेन. आणि तुला आव जावं बोलणार नाही असं ही नारायण राणे म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here