शेखरशेठ देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेष्ठ नागरिक संघटनेच्या रायगड जिल्हाअध्यक्ष पदी निवड

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :-माणगांव तालुक्यातील इंदापुर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते तसेच जेष्ठ नेते शेखरशेठ देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेष्ठ नागरी रायगड जिल्हा अध्यक्ष पदी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी रवीवार दि.१६ आँक्टोबर २०२२ रोजी सुतार वाडी गीता बाग येथे नियुक्ती पञ देऊन त्यांची निवड केले आहे.

यावेळी खा.सुनील तटकरे यांनी बोलताना सांगितले की शेखरशेठ देशमुख हे फार जुने जानते पक्षाचे कार्यकर्ते असून पक्षासाठी ते गेली अनेक वर्षे एक नीष्ठेनी काम करत आहे. त्याचे सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात माणगांव तालुक्यात इंदापुर विभागात फार मोठे योगदान आहे. आज ते चाळीस वर्षाच्या तरूणांना लाजवतील असे काम करत असल्याचे सांगितले.

यावेळी शेखरशेठ देशमुख यांनी बोलताना सांगितले की या वयातही माझ्यावर विश्वास ठेऊन खा.सुनील तटकरे यांनी जी जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी मी यशस्वी रीत्या पूर्ण करेन तसेच संपूर्ण जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांची संघटना उभारून त्यांची बांधणी करून मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन.

यावेळी सुतारवाडी येथे रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष मधूकर पाटील, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस युवक सचिव दिपक जाधव,महाड,पोलाद,माणगांव मतदार संघाचे अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर,इंदापुर विभाग राष्ट्रवादीचे अध्यक्ष काका नवगणे,तळाशेत ग्रा.प.माजी.उपसरपंच उदय अधिकारी,तळशेत ग्रा.प.उपसरपंच समिर मेहता,इंदापुर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बाळा खातू, निजामपुर सरपंच राजाभाऊ रनपीसे,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते महादेव बक्कम, मनोजशेठ जैन, नंदु उभारे,राजू कदम,राजेद्र वाढवाळ, दत्ताशेठ पाटील, राम येलकर,हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here