अखेर…तीन दिवसानंतर त्या युवकाचा मृतदेहच मिळाला
• युवकाचा नहरात बुडून मृत्यू
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351
सावली : 16 ऑक्टोबर
खत टाकण्यासाठी शेतात गेलेल्या तरुणाचा मृतदेह तीन दिवसानंतर आसोलामेंढा नहरात सोमवार, 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास आढळून आला. प्रज्वल रोशन डोहने (21, सावली) असे मृतकाचे नाव आहे.
हा तरूण मेव्हण्यासोबत शनिवारी पहाटेच्या सुमारस शेतात खत टाकण्यासाठी गेला होता. खताच्या पिशव्या नहरालगतच्या शेतात ठेवल्यानंतर मेव्हणा रोजंदारी मजूराला आणण्यासाठी चेकपिरंजी येथे गेला होता. मेव्हणा व रोजंदारी मजूर शेतात परत आले असता प्रज्वल तेथे नव्हता. त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तो कुठेच आढळून आला नाही. या बाबतची तक‘ार सावली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी शोधमोहिम राबविली. मात्र, त्याचा शोध लागला नाही.
चकपिरंजी परिसरात वन्यजीवांचा धूमाकुळ सुरु असल्याने प्रज्वल वाघाच्या हल्ल्यात बळी ठरला असावा किंवा नहरात बडून वाहत गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविल्या आला होता. शोधमोहिमेदरम्यान तिन दिवसानंतर सोमवारला सायंकाळी 6.30 वाजता गडीसुला-फिस्कुटी मार्गावरील दामोधर मोहुर्ले यांच्या शेतालगत नहरात प्रज्वलचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतकाच्या पश्चात आई, वडील, बहीण असा आप्त परिवार आहे, पुढील तपास सुरु आहे.