अनुप्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर उसळला भीमसागर जयभीमच्या जयघोषाने निणादली दीक्षाभूमी

50
अनुप्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर उसळला भीमसागर जयभीमच्या जयघोषाने निणादली दीक्षाभूमी

अनुप्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर उसळला भीमसागर

जयभीमच्या जयघोषाने निणादली दीक्षाभूमी

अनुप्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर उसळला भीमसागर जयभीमच्या जयघोषाने निणादली दीक्षाभूमी

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर, 16 ऑक्टोबर
67 वर्षानंतर आजही चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर अनुप्रवर्तन दिनाला लाखोंचा जनसागर उसळतो. डॉ. बाबासाहेबांनी जेव्हा या पावन भूमीवर दीक्षा दिली होती, तेव्हाही असेच चित्र होते. आजही भगवान बुद्धाच्या धम्माचे चक्र अविरतपणे फिरत आहे. ही सारी किमया डॉ. बाबासाहेबांचीच आहे. सोमवारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूरच्या वतीने आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाच्या दुसर्‍या दिवशीचा प्रारंभ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाला. तसेच बाबासाहेबांच्या अस्थीकलशासह भिख्यू संघाच्या आणि समता सैनिक दलाच्या शौर्यशील पथसंचलन आणि भव्य मिरवणुक लक्षवेधी होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांच्या नेतृत्त्वात ही मिरवणूक निघाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण व सामूहिक बुद्धवंदनेनंतर बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन जटपुरा गेट मार्गे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकातून वरोडा नाका ओलांडत दीक्षाभूमीवर पोहोचली. या मिरवणुकीत समता सैनिक दलाचे 500 विद्यार्थी सहभागी झाले होते. ही भव्य मिरवणूक दीक्षाभूमीवर आल्यावर पूज्य भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हरते बुद्ध विहारात बाबासाहेबांचा अस्थिकलश जनतेच्या दर्शनार्थ ठेवण्यात आला. त्यानंतर समता सैनिक दलाच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीप्रति कटिबद्ध राहण्याची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात सामूहिक बुद्धवंदनेने झाली. या समारंभाचे अध्य भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी, दीक्षाभूमिवर उपस्थित बोध्दबांधवांना धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यागोदे भद्र नागसेन, भदन्त धम्मवोधी, सन्देय भदन्त धम्मविजय, अध्देय भदन्त कश्यप, बध्देय भदन्त प्रकाश, संरथेचे अध्यक्ष अरुण घोटेकर, अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आबेडकर मेमोरियल सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, सचिव वामन मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, अ‍ॅड्, राहुल घोटेकर, प्राचार्य डॉ राजेश दहगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भदन्त नागसेन म्हणाले की, संपूर्ण जग बुद्धाला मानते म्हणूनच जगातील बहुतेक राष्ट्राने बुद्धाचे तत्वज्ञान आत्मसात केले आहे. बुध्दाचा धम्म बौद्ध अनुयायांनी जर आचरणात आणला तर चळवळ अधिक गतीमान होईल, असे सांगितले. संचालन डॉ. रिना सदाफळे व आभार डॉ. एन. एस. रामटेके यांनी मानले.