गावंडे महाविद्यालयाचा संघ आंतर महाविद्यालयीन क्रिकेट ‘डी’ झोन स्पर्धेचा उपविजेता
✒️ बबलू भालेराव ✒️
तालुका प्रतिनिधी उमरखेड मो.9637107518
उमरखेड (दि.17 ऑक्टोंबर)
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रिकेट डी झोन स्पर्धा 3 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाल्या.
या स्पर्धेत नऊ संघांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
अंतिम सामना 16 ऑक्टोबर रोजी पुसदच्या फुलसिंग नाईक महाविद्यालय विरुद्ध गो.सी. गावंडे महाविद्यालय, उमरखेड यांच्यात झाला.
फुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसदचा संघ विजयी ठरला. गो.सी. गावंडे महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला.
सामना झाल्यानंतर लगेच या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम, फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक संचालक प्रा. गडधाने, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. बी. एम. सावरकर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस. बी. वाघमारे, क्रीडा संकुलचे प्रशिक्षक मोहम्मद शकील, प्रा. आनंद वाढवे, श्री चंद्रकांत शिंदे, प्रो. डॉ. पी. वाय. अनासाने, प्रा. पी. के. नखाते, शेख सद्दाम, ताबीज खान, अरसलान, महेश गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या शुभहस्ते दोन्ही संघांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
गावंडे महाविद्यालयाचा क्रिकेट संघ उपविजेता झाल्याबद्दल प्राचार्य, उपप्राचार्य , पर्यवेक्षक, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी चमूचे अभिनंदन केले. बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. पी. के. नखाते यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. बी. एम. सावरकर यांनी केले.