वडसखुर्द ग्रामपंचायत महिन्यामागून महिना बंद राहिल्याने घरकुलाच्या कागदपत्रांमध्ये होते आहे अडचण
प्रतिनिधी : शत्रु आतला
एटापल्ली :- वडसखुर्द ग्रामपंचायत एटापली तालुक्यात येत असल्याने येथील प्रत्येकालाच कुटुंबाच्या कागदपत्रांची अडचण होते.
ती अनेक महिन्यांपासून बंद आहे, वडसाखुर्द ग्रामपंचायत तील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये उपस्थित नाहीत, या ग्रामपंचायत मध्ये केवळ पाच ग्रामस्थ आहेत. आणि प्रत्येक नागरिकाला घरकुल योजना मिळाली आहे,
आणि त्या सर्वांना घर कर पावती आणि गाव नमुना 8A फॉर्म आवश्यक आहे परंतु
ग्रामपंचायत मध्ये जाऊन हे काम केले जात नसल्याने ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये येत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, काम करायचे नसेल तर राजीनामा द्या.
असे या ग्रामपंचायत च्या सर्व घरकुल लाभार्थ्यांचे मत असून, इटापली येथील एसडिओ साहेबांनी लवकरात लवकर या ग्रामसेवका कार्यवाही करावी ग्रामपंचायत तून काढून टाकावे व चांगले काम करू शकेल अशा व्यक्तीची तात्काळ नियुक्ती करावी अशी घरकुल लाभार्थ्यांची मागणी
आहे?हा ग्रामसेवक अजिबात ग्रामपंचायत मद्ये येत नसल्याने,
कागदपत्रासाठी आठवडा लागतो पण काम होत नाही त्यामुळे या ग्रामसेवकांना लवकरात लवकर वडसखुर्द ग्रामपंचायत मधून हटवा.
आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून इटापलीचे एसडिओ साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर या ग्रामसेवकाला हटवून नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती करावी.
कारण हा ग्रामसेवक ठेकेदार असल्याने ग्रामपंचायतीला वेळ देत नाही.असा आम्ही ग्रामपंचायत चे मेंबर व गाववासी मिळून निवेदन करतो