बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये “फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे” सत्र संपन्न

99
बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये “फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे” सत्र संपन्न

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये
“फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे” सत्र संपन्न

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये “फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे” सत्र संपन्न

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 17 ऑक्टोंबर
१४ ऑक्टोबर पासून AICTE ATAL अकादमी नवी दिल्ली द्वारा प्रायोजित राष्ट्रीय स्तरावरील “Artificial Intelligence and Machine Learning” या विषयावर सुरु असलेल्या सहा दिवशीय Faculty Development Program च्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीचे सत्र संपन्न झाले. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात संस्थेचे प्राचार्य वि. एस. कोयाळ यांनी आपल्या प्रास्ताविकेतून AICTE ATAL अकादमीचे संचालक डॉं. सुनील कुमार लूथरा यांचा प्रामुख्याने उल्लेख करून FDP या कार्यक्रमाच्या आयोजनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राचे प्रमुख डॉं. तौसीफ दिवान HOD, CSE, IIIT नागपूर यांनी DEEP LEARNING MODELLING TECHNIQUES यावर वर्तमान प्रगती, स्विकृती आणि आह्वाने यावर विशेष मार्गदर्शन केले. त्यानंतर याच दिवशीच्या दुसऱ्या सत्राचे प्रमुख प्रा. जितेंद्र टेंभुर्णे IIIT नागपूर यांनी नैसर्गिक भाग प्रक्रिया आणि उत्पादक्षम नमुने यावर सविस्तर चर्चा घडवून आणली.
तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राचे प्रमुख जया आवरी MEDITATION TRAINER, समर्पण सेंटर, नागपूर यांनी MEDITATION TECHNIQUES आणि PRACTICE याबद्दल सविस्तर माहिती दिली. तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्राचे प्रमुख डॉं. जि. के. आवरी HOD AUTOMOBILE ENGG. GOVT. POLY. नागपूर यांनी IC इंजिनमधील हानिकारक वायूंचे ऑन बोर्ड सेन्सिंगसाठी रिअल टाइम एक्झॉस्ट गॅस सेन्सिंग सिस्टम यावर मोलाचे मार्गदर्शन केल.
या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. के. एस. झाडे व सहसमन्वयक प्रा. एस. एस. वाढई व संगणक विभाग प्रमुख प्रा. प्रियंका सिंग यांची प्रामुख्याने उपस्तिथी होती. सदर सत्रात राज्यातील आणि राज्याबाहेरील विविध संस्थातील प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.