महाराष्ट्र भाजपा प्रदेश ओबीसी आघाडीच्या वतीने हंसराज अहीर यांचा सत्कार

77
महाराष्ट्र भाजपा प्रदेश ओबीसी आघाडीच्या वतीने हंसराज अहीर यांचा सत्कार

महाराष्ट्र भाजपा प्रदेश ओबीसी आघाडीच्या वतीने हंसराज अहीर यांचा सत्कार

महाराष्ट्र भाजपा प्रदेश ओबीसी आघाडीच्या वतीने हंसराज अहीर यांचा सत्कार

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर/यवतमाळ/नागपुर : 17 ऑक्टोंबर
राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील काही जातींचा इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केली होती. या शिफारसीच्या अनुषंगाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने सखोल तपासणी करीत आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या निर्देशान्वये इतर मागासवर्गीय जाती/पोटजातींचा केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास मान्यता दिली आहे.

यामध्ये बडगुजर, सुर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, व रेवा गुजर तसेच पोवार, भोयर आणि पवार तसेच कापेवार, मुन्नूरू कापेवार, मुन्नूरू कापू, तेलंगा, तेलगी, पेंटारेड्डी, बुकेकरी व अन्य जाती/उपजातींचा सुध्दा राज्य सरकारच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचीमध्ये समावेशास आयोगाने हिरवी झेंडी दाखविली आहे.

उल्लेखनीय बाब अशी की, हंसराज अहीर यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मा. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत मायको ओबीसी संपर्कादरम्यान विविध समाजाच्या बैठकीत दिलेले होते.

मागील बऱ्याच वर्षांपासून ओबीसी जातींना केंद्राच्या सुचीत समाविष्ठ करण्यासंदर्भात प्रलंबित असलेला हा विषय तात्काळ मार्गी लावण्यास विशेष पुढाकार घेवून अनेक ओबीसी जाती/पोटजातींना न्याय दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी प्रदेश ओबीसी आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संजय गाते व अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हंसराज अहीर यांचा मुंबई स्थित प्रदेश भाजपा कार्यालय येथे यथोचित सत्कार करून ओबीसी आघाडीकडून त्यांचे आभार मानण्यात आले.