आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पो.निरीक्षक नितीन मोहिते यांचे आव्हान…
✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞
कोलाड : निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जाहीर करण्यात आली असून अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही विधानसभा निवडणूक भयमुक्त व पारदर्शक वातावरण पार पाडण्यासाठी आलेल्या आचारसंहितेचे सर्व जनतेने काटेकोरपणे पालन करावे असे सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या वेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी शिवसेना (उबाठा) , शिवसेना (शिंदे गट) , शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) , भाजप व सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राजकीय पक्षांशी संबंधित जाहिरात फलक, बॅनर, लाऊडस्पिकर यासारखे शासकीय स्वरूपाचे फलक व प्रचार रॅली काढण्याच्या दोन दिवस अगोदर सांगणे मतदानाच्या दिवशी बुथ वरती व मतदान केंद्रात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही. याची खबरदारी घेणे असे कोलाड पो.ठाणे. सहा.पो.निरीक्षक नितीन मोहिते यांनी आव्हान केले..यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कोलाड पो.ठाणे. गोपनीय अंमलदार नरेश पाटील उपस्थितीत होते.