मंदिर उघडताच चोरट्यांनी फोडली दानपेटी.

कोडंया महाराज देवस्थानातील दानपेटी भामट्यांनी फोडली. घटनेची माहिती कुणालाही होऊ नये यासाठी चोरट्यांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्हीला पोत्यांनी झाकून वायर कापले व दानपेटी फोडली.

जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर :- गोंडपिपरी  महाराष्ट्र व तेलंगणातील शेकडो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धाबा येथील कोडंया महाराज देवस्थानातील दानपेटी भामट्यांनी फोडली. घटनेची माहिती कुणालाही होऊ नये यासाठी चोरट्यांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्हीला पोत्यांनी झाकून वायर कापले व दानपेटी फोडली. राज्य सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिल्यानंतर पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला. मंदिर प्रशासनाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे श्री संत कोंडया महाराज देवस्थान आहे. विदर्भ व तेलंगणातील हजारो भक्तांची महाराजांवर मोठी श्रध्दा आहे. मंदिराच्या बाहेर एक तर आत एक अशा दोन दानपेट्या आहेत.

यापैकी बाहेर असलेल्या दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला. मंदिर परिसरात सीसीटीव्ही आहे. आपल्या चोरीचा प्रकार उघड होऊ नये यासाठी त्यांनी सीसीटीव्हीवर चक्क पोते झाकले होते. नंतर वायरी कापले व दानपेटी फोडली.

चोरट्यांनी मंदिर उघडताच रक्कम लांबविली. मागील पंधरवाड्यापूर्वी देखील असाच प्रकार घडला होता. मंदिर प्रशासनाने दानपेटी फोडल्याच्या घटनेची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. याप्रकरणाचा तपास धबा पोलिस करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here