पलटी झालेल्या ड्रॉयफूड च्या ट्रक चे प्रकरण निघाले काही वेगळेच

54

पलटी झालेल्या ड्रॉयफूड च्या ट्रक चे प्रकरण निघाले काही वेगळेच

चाळीस लाखाचे ड्रॉयफूड लोकांनी केले होते लंपास

चालकाने ट्रक ची नंबर प्लेट ही लावली होती बनावट

मुकेश चौधरी प्रतिनिधी

तळेगांव :- काल तळेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारवाडी शिवारात एक ड्रॉयफूड घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला होता. याबाबत ची माहिती मिळताच पोकिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कोणी जखमी असेल तर तातडीने मदत देता येईल या उद्देशाने धाव घेतली खरी मात्र इतक्या भयानक स्थितीत ट्रक पलटी झाल्यावर कोणालाच साधी खरचटले कसे नाही, या शंकेने सर्व प्रकरण उलघडायला लागले आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हिमांशू चंद्रकांत भद्रा वय 30 वर्ष रा नागपूर यांचा श्री दिग्विजय फ्रेट सर्व्हिस ट्रान्सपोर्ट नागपूर या नावाचे ट्रान्सपोर्ट चालवत असून त्यांनी दिनांक 10,11,2020 ला नवी मुंबई येथून नागपूर करिता द्रायफूड च्या मालाची ऑर्डर असल्याने फिर्यादी चे मुंबई येथील भाऊ मेहुल चंद्रकांत भद्रा यांचे मार्फत वाहन क्रमांक MH 40 AK 5333 या गाडीचे मालक व चालक जमीर अहेमद जमील अहेमद यांस नवी मुंबई येथील APMC येथून द्रायफूड माल नागपूर ला आणणे करिता ऑर्डर दिला.त्यानुसार नवी मुंबई APMC येथून वाहन क्रमांक MH40 AK 5333याने द्रायफूड चा 18 टन 110 KG माल ज्यामध्ये बदाम, पिस्ता, खारीक, खजूर, अजिनोमोटो, मिक्स द्रायफूड, जावंत्री मसाल्याचे पदार्थ किंमत अंदाजे 40 लाख असा माल लोड केला केला तसेच त्यामध्ये 2 टन वजनाची आरामशिन सलीम अहमद सैय्यद नागपूर याची होती. व गाडी रवाना झाली होती.

अचानक काल फिर्यादी च्या भावाच्या मोबाईल वर तळेगाव नजीक गाडीचा अपघात झाल्याचा म्यासेज आल्याने फिर्यादी हे चौकशी साठी आले असता घटनास्थळी वाहन क्रमांक MH 40 BG 1599 असा ट्रक रोडच्या खाली पलटी झालेला दिसला ,व त्यात काही द्रायफूड चा मालगाडी मध्येच होता व इतर माल गायब होता. याबाबत पलटी झालेल्या चालकास वाहन क्रमांक वेगळा आहे असे फिर्यादी ने विचारले असता तेव्हा चालकाने सांगितले की माझ्या गादीवर फायनान्स असल्याने खामगाव जवळ मी गाडीची नंबर प्लेट चेंज करून वाहन क्रमांक MH40 BG1599 हा चढविला.यावरून फिर्यादी ने नांदगाव पेठ जिल्हा अमरावती येथील टोल नाक्यावर पाहणी केली असता सादर गाडीचे वेट 23 टन भरल्याचे निदर्शनास आल्याने यातील चालक जमीर अहेमद तसेच क्लिनर मोहम्मद जुबेर फजलाणीमोहम्मद आरिफ फाजलाणी व त्यांचे सोबत असलेला एक अनोळखी इसम यांनी बनावट नंबर प्लेट चा ट्रक पलटी करून अपघात झाल्याचे भासवून माझा विश्वासात केला या असल्याच तक्रारीत नमूद केले आहे.

यावरूउन पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा ,जमादार संदीप महाकाळकर,परबत, अमोल मानमोडे, अनिल ढाकणे,अमोल इंगोले,सुभाष डांगे, गुजर, आदी कर्मचारी करत आहेत