मुबंई गोवा महामार्गावर भरधाव कारची ऑटो रिक्षाला धडक; चार जण जखमी
संतोष मोरे
इंदापूर विभाग प्रतिनिधी
मो: 7276143020
इंदापूर:-माणगांव कडून मुंबईकडे जाणाऱ्या होंडा कंपनीची गाडी क्र.एम.एच.01 बी.जी 5989 या कार ने मुंबई कडून महाड कडे जाणाऱ्या ऑटो रिक्षा क्र.एम. एच. 02 ई डब्ल्यू 6101या रिक्षाला धडक दिल्याने चालका सह जखमी 1) आशिष शांताराम पवार, वय 30 वर्ष 2) संजय दगडु भिलारे, वय 52 वर्ष 3) प्रदीप सदाशिव पवार ,वय 50 वर्ष 4) प्रमिला प्रदीप पवार , वय 48 वर्ष रा. पुनाडे वाडी ता. महाड यांना उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले.
दि. 15/11/2022 रोजी, वेळ.22.30 वा. चे सुमारास मुंबई गोवा हायवे रोड ने खरवली फाट्याच्या पुढे माणगांव बायपास सुरुवातीचे ठिकाणी कार ने रिक्षाला धडक दिल्याने हा अपघात झाला.आधीच मुंबई गोवा हायवे हा तर खड्यांचे साम्राज्य असलेला रस्ता याकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष,जनता ही झाली त्रस्त ह्यात अनेक लोक अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. आणि आशा वेळी वाहन चालक आपल्या आलिशान गाडीतून जाताना हयगयीने बेदखलपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी चालवताना हा अपघात झाला आहे. चार इसम जखमी तर वाहनांची नुकसानी झाली. अपघाताची माहिती मिळताच माणगांव पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. फिर्यादी:आशिष शांताराम चव्हाण, वय 30 वर्ष व्यवसाय रिक्षा चालक रा.पुनाडेवाडी ता.महाड, सध्या रा. तानाजी मालुसरे मार्ग विलेपार्ले. यांच्या तक्रारी वरून आरोपी: अनिल अनंतराव घनवट, वय 46 वर्ष व्यवसाय नोकरी रा.मयुरेश सृष्टी डी. विंग. 401 लालबहादूर शास्त्री नगर भांडुप वेस्ट यांच्यावर गुन्हा रजि. व कलम कॉ. गु. रजि. नं. 334/2022
भा.द. वि.स. कलम 279,337,338,कलम 184 प्रमाणे दि.16/11/2022 रोजी वेळ.01.09 वा.गुन्हा दाखल. या कामी व्हिजिट पो.नि. श्री पाटील साहेब माणगांव पोलीस ठाणे, दाखल अंमलदार: पो ना/1624 खिरीट पोलीस माणगांव, तपशील: अंमलदार स.पो.नि.आस्वर पोलीस माणगांव यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.