महिलासाठी माणगांव पोलीस ठाण्यात स्तृत्य उपक्रम, माणगांव पोलीस ठाण्यात सॅनिटरी नॅपकिन मशीनचे उदघाटन

48

महिलासाठी माणगांव पोलीस ठाण्यात स्तृत्य उपक्रम माणगांव पोलीस ठाण्यात सॅनिटरी नॅपकिन मशीन च उदघाटन

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-सामाजिक कार्यात पोलीस नेहमीच अग्रेसर असतात. अशाच जनजागृतीपरं माणगांव पोलिसातर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. असाच एक स्तृत्य उपक्रम माणगांव पोलिसांनी राबविला आहे. आज दिनांक १६ नोव्हेंबर रोजी ह्यूमॅनिटी युनायेटेड फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत जोशी, सह संस्थापक सौ प्रियल जोशी कोकण विभाग अध्यक्ष सचिन शिंदे याच्या नेतृत्वाखाली माणगांव पोलीस ठाणे येथे सॅनिटरी नॅपकिन मशीन बसविण्यात आले आहे. माणगांव पोलीस ठाण्यात कामानिमित्त त्याचप्रमाणे आपल्या समस्था निवारण्यासाठी आलेल्या तक्रारदार गोरगरीब तसेच आदिवासी महिलाभगिनींना देखील यांचा लाभ मिळणार आहे. अत्यंत कमी किमतीत उच्च प्रतीचे जागतिक मान्यताप्राप्त आरोग्य संघटना डब्लू एच ओ ने शिफारस केलेले डबल कोटींग सॅनिटरी नॅपकिन पॅड महिलांच्या आरोग्याचे दृष्टीकोनातून निर्धाक असल्याची माहिती ह्युंमनिटी फेडरेशन चे सह संस्थापक सौ प्रियल प्रशांत जोशी यांनी उपस्थित विद्यार्थी व महिला भगिनीना मासिक पाळीच्या स्वच्छता मुद्यावर मार्गदर्शन करण्यात आले या संदर्भात नेहमीच लाज संकोच बाळगल्याने महिला व युवतीच्या अनेक गंभीर अशा समस्थ्यांना तोंड द्यावे लागते मासिक पाळीतील मनातील लज्जा संकोच ची जागा गर्व आणि आनंदात बद्दलण्यासाठी ह्युंमनिटी युनायटेड फेडरेशन द्वारा पाच दिवस फ्री अभियान सुरु केले आहे अशी माहिती दिली.

रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाणे येथे माणगांव चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेद्र पाटिल साहेब याच्या मार्गदर्शनखाली पोलीस ठाण्यात बसविण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिन वेडीग मशीनच्या उदघाटन प्रसंगी डॉक्टर साकोलीकर, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, पो. शि. रामनाथ डोईफोडे, श्याम शिंदे, पो. ह. ओमले, मदने, महिला दक्षता समिती सद्यस्त मिरजकर, तुळसा पवार, किशोरी हिरवे तसेच अशोक दादा साबळे कॉलेज च्या विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांना सॅनिटरी नॅपकिन मोफत वाटप करण्यात आल्या. यावेळी माणगांव महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी व महिलांना मौलाच मार्गदर्शन केले पाच रुपयाचा शिक्का या मशीनमध्ये टाकताच सॅनिटरी नॅपकिन मशीनमधून बाहेर येते या सेवेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन सुद्धा माणगांव पोलीस ठाण्यातून करण्यात आले आहे.