आमदार निलेश लंके यांनी स्नेहालयातील वंचित मुलांसोबत केली दिवाळी साजरी

59

आमदार निलेश लंके यांनी स्नेहालयातील वंचित मुलांसोबत केली दिवाळी साजरी

आकाश पवार, अहमदनगर

देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे दिवाळी. मात्र, आजही समाजातील अनेक घटक असे आहेत ज्यांच्या आयुष्यात वर्षभर अंधारच असतो. नगर जिल्ह्यातील स्नेहालयातील वंचित मुलांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश यावा म्हणून त्यांच्यासोबत आमदार निलेश लंके यान्ही दिवाळी साजरी केली. स्नेहालयातील मुलांनी आमदार निलेश लंके यांचे स्वागत गीत सादर करून आनोख्या पद्धतीने स्वागत केले. 

या विद्यार्थ्यांना भाऊबीजेच्या निमित्ताने विविध फराळाच्या पदार्थांचे तसेच फटाकायचे वाटप करण्यात आले तसेच मुलांसोबत फटाक्यांचा आनंद घेतला .आमदार निलेश लंके यान्ही मुलांमध्ये सोबत गप्पागोष्टी करत, अभ्यास करून पुढे जा अशी सूचना करतानाच तुम्हाला कुठलीही मदत लागली तर मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे त्यान्हा सांगितले . पुढे मुलांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आयुष्य जगत असताना व्यसनांपासून दूर राहा स्नेहलयातील संस्कार नक्कीच तुम्हाला भविष्यातील दिशा दाखवतील.तसेच माझ्या आयुष्यातील आत्तापर्यंतच्या सर्व दिवाळी सणांमध्ये आजचा दिवस मला खूप आनंद देऊन गेला दरवर्षी मी याठिकाणी दिवाळी साजरी करायला येणारच असे मुलांना आश्वासनदेखील दिले 

यावेळी स्नेहालय संस्थेचे अनिल गावडे सर, ॲड.राहुल झावरे,अजय लामखडे, सुनील कोकरे, संदीप चौधरी,सुहास नगरे,भाऊ साठे, नितीन भांबळ,दत्ता खताळ,सचिन पठारे, बाबासाहेब पगारे,जयराम खेडकर,सागर जगताप आदि मान्यवर उपस्थित होते.