शिवसेना नेते अनंत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना पनवेल विधानसभा पदाधिकारी मेळावा संपन्न

180

शिवसेना नेते अनंत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना पनवेल विधानसभा पदाधिकारी मेळावा संपन्न

 

कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
9833534747

पनवेल: शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना पनवेल विधानसभा पदाधिकारी मेळावा आज महाजनवाडी हॉल, पनवेल येथे पार पडला.

येणारी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकांची तयारी, उमेदवारांचा प्रचार प्रसार, युवा सेनेचा विस्तार, मतदार यादी संदर्भातील छाननी तसेच मतदार जागरूकता आधी विषयांवर शिवसेना नेते अनंत गीते , शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत आणि जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला आदींनी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच यावेळी युवासेनेच्या प्रमुख नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या.

या मेळाव्याला सह संपर्कप्रमुख श्री. अनिल चव्हाण, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगरप्रमुख अवचित राऊत, तालुकाप्रमुख श्री. ज्ञानेश्वर बडे, शहर प्रमुख प्रवीण जाधव, यतिन देशमुख, सदानंद शिर्के, रामदास गोवारी, प्रदीप केनी, माजी नगरसेवक अतुल पालन, संतोष गोळे, उपशहर संघटिका उज्वला गावडे,अश्विनी देसाई, शाखाप्रमुख मयुरेश पाटील आदी शिवसेना, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

सदर मेळाव्याचे आयोजन आणि नियोजन करण्यात युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते यांच्यासह विधानसभा अधिकारी अजय पाटील, तालुका अधिकारी मनोज कुंभारकर, महानगर अधिकारी महेश भिसे, महानगर समन्वयक जय कुष्टे, सुशांत सावंत, शहर अधिकारी निखिल भगत, सिद्धेश गुरव आदींनी मोलाचा वाटा उचलला. तसेच यावेळी उपप्रमुख नितीन पाटील, विधानसभा समन्वयक अरविंद कडव, महानगर चिटणीस जीवन पाटील, तालुका चिटणीस सूरज गायकर, युवती सेनेच्या काजोल व्हरकटे, लीना खडकबाण, यतीन मानकामे यांच्यासह युवा सेनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.