हिंगणघाट जळीतकांड खटल्यात विकेश नगराळेची बाजू मांडणार प्रसिद्ध वकील विजय ढेकले.

हिंगणघाट अंकिता पिस्सुडे जळीतकांड खटल्याच्या सुनावणीला 12 पासुन सुरुवात झाली सरकार तर्फे उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद करणार आहे. तर दुसरीकडे वीकेश नगराळे तर्फे हिंगणघाट येथील प्रसिद्ध वकील विजय ढेकले हे आपली बाजू मांडणार आहे.

3 फेब्रुवारीला सकाळी हिंगणघाटला घडलेल्या प्रा. अंकिता पिस्सुडे जळीतकांडा मुळे संपुर्ण हिंगणघाट बरोबर महाराष्ट्रात गाजला होता. त्यामुळे या खटल्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मुकेश चौधरी प्रतिनिधी
हिंगणघाट:- राज्यात गाजलेल्या अंकिता पिस्सुडे जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीला सोमवारपासून न्यायालयात सुरुवात झाली आहे. या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार उज्ज्वल निकम सोमवारी हिंगणघाट न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी हजर झाले होते. आता न्यायालया तर्फे विकेश नगराळे याला वकील देण्यात आला. त्यात हिंगणघाट येथील प्रसिद्ध वकील विजय ढेकले हे विकेश नगराळेची बाजू मांडणार आहे त्यामूळे हिंगणघाट न्यायालयात उज्ज्वल निकम विरुध्य विजय ढेकले यांचा युक्तीवाद रंगनार असे चित्र दिसून येत आहे.

 

कोविडमुळे थांबलेल्या या प्रकरणाची सुनावणी न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महाराष्ट्रात बहुचर्चित असलेल्या या प्रकरणाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here