*अधिवेशनाचे पहिल्याचं दिवशी बेरार प्रांतातील कोळी महादेव समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी चा शासन निर्णय काढा- डॉ.अनुपकुमार यादव प्रधान सचिव आदिवासी विकास यांचेकडे शिष्टमंडळाची मागणी*
मुख्यमंत्री यांनाहि निवेदनाची प्रत देऊन पंढरपूर जाहीर सभेत कोळी महादेव समाजाचा प्रश्न सोडवनार त्यांच्या या आश्वासनाची दिली आठवण,
मुंबई मंत्रालय दि.16-12-2020
अधिवेशनाचे पहिल्याच दिवशी तारीख14 डिसेंबर रोजी बेरार कोळी महादेव समाजबांधव शिष्टमंडळाने मुंबईत मंत्रलयातील आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांचे दालनात “हर हर महादेव जय आदिवासी” असे नारे देऊन दालन दणाणून टाकले पोलिसांनी मध्यस्ती करत शांत केले.आदिवासी विकास विभागाचे डॉक्टर अनुपकुमार यादव भा. प्र. से.यांना निवेदन देऊन
सातपुडा महादेवाच्या डोंगर पायथ्याशी असलेल्या बेरार वऱ्हाड प्रांतातील संविधानिक असलेल्या अमरावती महसूल विभाग आदिवासी कोळी महादेव जमातीला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी चा शासन निर्णय काढा अशी मागणी केली त्यांना विस्ताराने माहिती देत मागील अधिवेशनात आदिवासी विकास मंत्री यांनी लक्षवेधी उत्तरावर पूरक निवेदन देऊन पुरातन भक्कम पुरावे देण्यात सातत्याने अनेक वर्षे सरकारकडे पाठपुरावा करत असूनही सरकार लक्ष देत नाही म्हणून राज्यातील कोळी महादेव समाज संतप्त आहे एकत्र येत सरकरप्रति उद्रेक करण्यासाठी नियोजन सुरू आहे त्याची झलक मंत्रालयात दिसेल असे ही डॉ यादव यांना चर्चा करतेवेळी शिष्टमंडळातील पदाधिकारी यांनी सांगितले म्हणून सरकारने शासन निर्णय काढा अशी मागणी केली.यावेळी कोळी महादेव बेरार संघर्ष समितीचे पदाधिकारी उमेशराव ढोणे, गोपालभाऊ ढोणे ,सुधाकर घुगरे, राजेंद्र कोलटके, विलासराव सनगाळे, जगनन्नाथ तराळे,नंदकिशोरअपोतीकर, बाळू जुवार,मनोज धनी, विठ्ठलराव संनगाळे , नाजुकराव खोडके, मधुकरराव तराळे, , आदींच्या उपस्थितीमध्ये आदिवासी प्रधान सचिव यांना निवेदन देऊन त्याची प्रत मुख्यमंत्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांनाही देण्यात आली मुख्यमंत्री यांनी पंढपुर येथे जाहीर सभेत कोळी महादेव समाजाचा प्रश्न सोडवणार असल्याने जाहीर केले होते त्याचीही आठवण निवेदनातुन करुन दिली. .ठाकरे सरकारने लवकरच निर्णय काढा या साठी संपूर्ण महाराष्ट्रात कोळी महादेव समाज आक्रमक पवित्रा घेण्यासाठी सर्वत्र बैठका सुरू आहेत.