*धक्कादायक ! अल्पवयीन मुलीला दारू पाजून बेशुद्ध करून बलात्कार*

71

*धक्कादायक ! अल्पवयीन मुलीला दारू पाजून बेशुद्ध करून बलात्कार*

*पुणे*-अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिला बेशुद्ध करीत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना डेक्कन परिसरात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

साहिल महेंद्र तापकीर (वय २३, रा. दत्तवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या १६ वर्षीय मुलीची साहिल सोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्याने मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून डेक्कन परिसरातील एका लॉजमध्ये नेले. त्याठिकाणी त्याने अल्पवयीन मुलीला वोडका दारू पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.

याप्रकरणी डेक्कन पोलीस तपास करीत आहेत.