युवा मंडळ विकास अभियान कार्यक्रम खापरी येथे आयोजित

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- आयोजित युवा मंडळ विकास अभियान कार्यक्रम खापरी येथे पार पाडला, आज 17 /12/2020 ला हिंगणघाट तालुक्यातील खापरी येथे नगाजी युवा प्रेरणा मंडळ गांगापुर व नेहरु युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार च्या संयुक्त विद्यमान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 15 ते 29 वयोगटातील युवक तरुण युवती करिता खापरी गावामध्ये हे युवा मंडळ विकास अभियान पद्धतीने स्थापन करन्यात आले.

गावागावात पातळीवरील विविध कार्यक्रम विविध कला, कबबडी, क्रिकेट, खो खो, रनिग, सायकल रॅली, व सांस्कृतिक, क्रीडा असे उपक्रम नेहरू युवा केंद्राचे याद्वारे राबवले जातात. स्वछता अभियान मोहीम, वृक्षारोपण, कोविड जणजागृती, आरोग्य सेतू, राष्ट्रीय एकता दिवस, विविध कार्यक्रम, शासकीय उपक्रमाला सहभाग देण्यासाठी हे मंडळ तयार करून कार्यक्रमाला सुरुवात करते. युवकांनी संघटित होऊन त्यांचा नेतृत्व विकास व्हावा हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. अशी माहिती प्रमुख युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थाचे अध्यक्ष मागदशक राहुल दुरतकर व तसेच नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयंसेवक सचिन महाजन यांनी गावा गावात मंडळ तयार करून माहीत देण्यात आली. खापरी या गावात कार्यक्रम पार पाडला कार्यक्रम ला उपस्थित , शेती समूलन अध्यक्ष, अतुल वंजारी, व त्यांची टीम गावातील युवक, चंद्रकांत अरतपायरे, समीर देठे, विशाल वटाणे, मनोज अरतपायरे, स्वप्निल मून, रज्यत पाटील, हनुमान कोडापे, अक्षय पुसणाके, वैभव अरतपायरे, संदीप समुद्रकार, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here