चंद्रपूर जिल्ह्यातील 3 दिवस दारू दूकान बंद

53

चंद्रपूर जिल्ह्यातील 3 दिवस दारू दूकान बंद

चंद्रपूर जिल्ह्यातील 3 दिवस दारू दूकान बंद
चंद्रपूर जिल्ह्यातील 3 दिवस दारू दूकान बंद

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427

चंद्रपूर जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतीमध्ये 21 डिसेंबर रोजी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणूक असलेल्या क्षेत्रात मतदाना चे दिवशी कोरडा दिवस म्हणून जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) अन्वये तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येत असून या कालावधीत कोरडा दिवस पाळण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.
सावली,पोंभूर्णा,गोंडपिंपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही या नगरपंचायतीचा व नागभीड नगरपरिषद पोटनिवडणुकीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मंगळवार दि. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान व बुधवार दि. 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या मतदान व मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक व नागभीड नगरपरिषदेच्या पोटनिवडणूकीकरीता मतदान व मतमोजणी निमित्त येथील सर्व किरकोळ विक्री अनुज्ञप्त्या, सर्व मद्य, बिअर, ताडी विक्री करिता बंद राहतील.