आघाडी सरकारला जागा दाखवून देण्याची हीच वेळ : खा.सुनील मेंढे

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045
लाखणी:-शेतकरी आणि सर्वसामान्य विरोधी धोरण ठेवून राज्यात लोकमतांचा अनादर करून सत्तेत आलेल्या आघाडी सरकारमधील तीनही घटक पक्षांना त्यांच्या नाकर्तेपणासाठी जागा दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. कृषी पंपाची वीज कापणाऱ्या, धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडून आणण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावा, असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाखनी तालुक्यातील मुरमाडी तूप. जिल्हा परिषद क्षेत्राचे उमेदवार मा.पद्माकर बावनकर, पंचायत समिती मेंढा/टोला चे उमेदवार सुरेश झंझाळ व पंचायत समिती मुरमाडी/तूप चे भारत मारवाडे यांच्या प्रचारार्थ मौजा विहीरगाव, मेंढा टोला तसेच मुरमाडी तुप. येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होती.
यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सुनील मेंढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असताना शेतकऱ्यांच्या धानाला बोनस असो की त्याचे पैसे वेळेवर दिले गेले. शेतकऱ्याची वर्ग २ ची जागा १ करून शेतकऱ्यांना सात बारा मोकळा करून दिला. किसान सन्मान योजनेचे पैसे किंवा नुकसान भरपाईची मदत वेळेवर शेतकऱ्यांना मिळत गेली. मोदी सरकारच्या काळात 340 योजना जन सामान्यांसाठी आणल्या गेल्या. कोरोना काळात केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेमार्फत मोफत अन्न धान्य देण्याचा निर्णय घेतला. जे धान्य मार्च २०२२ पर्यंत गरजूंना दिले जाणार आहे.
21 डिसेंबर रोजी होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे व निवडून देण्याचे आवाहन खा.सुनील मेंढे यांनी केले.