शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळ सुरू ; अर्ज करण्याचे आवाहन

63

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळ सुरू ; अर्ज करण्याचे आवाहन

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळ सुरू ; अर्ज करण्याचे आवाहन
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळ सुरू ; अर्ज करण्याचे आवाहन

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

बुलडाणा : – सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे मार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण व परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थ्यास विभागाच्या https:// mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. महाडीबीटीच्या संकेत स्थळावर ऑनलाईन भरण्याची सुविधा माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाडीबीटी संकेतस्थळ शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत सुरु राहणार आहे.
सन 2021-2022 मध्ये प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता ऑनलाईन अर्ज 14 डिसेंबर 2021 पासून सुरू झााले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2022 आहेृ तरी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा वेळेच्या आत लाभ घ्यावा, तसेच विशेष करून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील विदयार्थ्यांचे अर्ज दुरूस्त करून ऑनलाईन सादर करण्यासही 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हयातील विविध महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज दिलेल्या मुदतीपूर्वी https:// mahadbtmahait.gov.in या शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर ऑनलाइन भरावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.