Home latest News जिल्ह्यातील 33 मतदान केंद्रांवर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान 21 डिसेंबर रोजी होणार...

जिल्ह्यातील 33 मतदान केंद्रांवर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान 21 डिसेंबर रोजी होणार मतदान, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी

64

जिल्ह्यातील 33 मतदान केंद्रांवर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान

21 डिसेंबर रोजी होणार मतदान, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी

जिल्ह्यातील 33 मतदान केंद्रांवर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान 21 डिसेंबर रोजी होणार मतदान, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी
जिल्ह्यातील 33 मतदान केंद्रांवर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान
21 डिसेंबर रोजी होणार मतदान, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

बुलडाणा :- जिल्ह्यात 21 डिसेंबर रोजी तेराही तालुक्यात 33 मतदान केंद्रांवर ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. सदर निवडणूक 123 ग्रामपचांयतींच्या 166 रिक्त जागांसाठी घेण्यात येत आहे. या निवडणूकीची मतमोजणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे. मतमोजणी ठिकाण व वेळेस जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 11 व ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 चे कलम 7 ई नुसार मान्यता दिली आहे. मतमोजणी सुरू होण्याची वेळ 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता असणार आहे.
मतमोजणीचे तालुकानिहाय ठिकाण : बुलडाणा-निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय बुलडाणा, चिखली : सभागृह तहसिल कार्यालय चिखली, सिं.राजा : निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय सिं. राजा, लोणार- तहसिल कार्यालय, मेहकर: सभागृह तहसिल कार्यालय, मोताळा : नविन सभागृह तहसिल कार्यालय, खामगांव : राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह, तहसिल कार्यालय, शेगांव: तहसिल कार्यालय, संग्रामपूर : तहसिल कार्यालय, नांदुरा: पंचायत समिती येथील कक्ष क्रमांक 1 समोरील खोली, दे. राजा : निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय, जळगांव जामोद : निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय, मलकापूर : निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या व रिक्त पदे : बुलडाणा-ग्रा.पं संख्या 2 व रिक्त पदे 2, चिखली: ग्रा.पं संख्या 11 व रिक्त पदे 15, दे .राजा: ग्रा.पं संख्या 5 व रिक्त पदे 6, सिं. राजा : ग्रा.पं संख्या 4 व रिक्त पदे 4, मेहकर : ग्रा.पं संख्या 17 व रिक्त पदे 32, लोणार : ग्रा.पं संख्या 8 व रिक्त पदे 8, खामगांव : ग्रा.पं संख्या 15 व रिक्त पदे 22, शेगांव: ग्रा.पं संख्या 7 व रिक्त पदे 7, जळगांव जामोद : ग्रा.पं संख्या 8 व रिक्त पदे 14, संग्रामपूर : ग्रा.पं संख्या 7 व रिक्त पदे 10, मलकापूर : ग्रा.पं संख्या 12 व रिक्त पदे 13, नांदुरा : ग्रा.पं संख्या 13 व रिक्त पदे 18, मोताळा : ग्रा.पं संख्या 14 व रिक्त पदे 15.