विक्रोळीतील शारदा हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे डॉजबॉल स्पर्धेत घवघवित यश, 42 शाळांमधून पटकावला प्रथम क्रमांक 

डॉ. संजय भोईर

विक्रोळी प्रतिनिधी, मुंबई 

मासूम संस्थेअंतर्गत दि. १२ ते १४ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक आंतररात्रशालेय क्रीडास्पर्धेत मुलींच्या डॉजबॉल प्रकारात एकूण 42 रात्र शाळेतील संघांनी सहभाग नोंदविला होता. करी रोड येथील दत्ताजी साळवी मैदानावर गुरूनारायण रात्र शाळेविरुद्धच्या अत्यंत चुरशीच्या लढाईत शेवटच्या मिनिटात बाजी मारत विक्रोळीतील शारदा रात्रशाळेतील मुलींनी बाजी मारली व प्रथम क्रमांकावर शारदा नाईट हायस्कूलचे नाव कोरले.

पंचांनी शारदा नाईट हायस्कूल विजयी झाल्याचे घोषित करताच प्रशिक्षक श्री. सचिन डोंगरे सर व श्री. अंकलेश बडेकर सर श्री अमित चव्हाण सर यांनी आनंदोत्सव साजरा केला. संस्थेचे संस्थापक सचिव सन्मा. श्री बी. डी. काळे सर व रात्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय सोनवणे सर यांनी सर्व सहभागी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व उत्कृष्ट खेळाचे कौतुकही केले. यामुळे सर्व सहभागी विद्यार्थिनींमध्ये उत्साह पहावयास मिळाला.

गेल्या अनेक वर्षापासून विक्रोळीतील शारदा नाईट हायस्कूल व जुनिअर कॉलेज तर्फे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबर सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहत असल्याचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनावणे यांनी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here