नगर पंचायत मुख्याधिकारीची हिटलर शाही खपवून घेतली जाणार नाही नगर विकास संघर्ष समितीचा ईशारा

58
नगर पंचायत मुख्याधिकारीची हिटलर शाही खपवून घेतली जाणार नाही नगर विकास संघर्ष समितीचा ईशारा

नगर पंचायत मुख्याधिकारीची हिटलर शाही खपवून घेतली जाणार नाही

नगर विकास संघर्ष समितीचा ईशारा

नगर पंचायत मुख्याधिकारीची हिटलर शाही खपवून घेतली जाणार नाही नगर विकास संघर्ष समितीचा ईशारा

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा 📱 मो.नं.9373472847 📞

भंडारा : ( मोहाडी ) : भंडारा जिल्ह्यातील नगर पंचायत मोहाडी येथे नेहमीच घोटाळा तर कधी सामान्य जनतेवर लावलेले जबरदस्ती कर, घन कचरा घोटाळा यामुळे नेहमीच प्रसिध्दी होतांना दिसत असते. नगर पंचायत चे मुख्यधिकारी आपल्या हिटलर शाही धोरण राबवून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम करीत आहेत.
नगर पंचायत ने अतोनात वाढविलेले घर टॅक्स विरोधात नगर विकास संघर्ष समिती व मोहाडी शहरातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येत जनआक्रोश मोर्चा काढला होता. त्यामुळे घर टॅक्स बाबत विशेष सभा नगर पंचायतला बोलावण्यात आली. व त्या मधे सर्व नगरसेवकांनी एकमताने घर टॅक्स वाढी बाबत ठराव सर्वानुमते नामंजूर करण्यात आलेला होता. पण मुख्याधीकारी यांनी जिल्हाधिकारी साहेबांचा नाव टाकून सर्व नगरसेवकाला पत्र दीले व स्वतः ला सुध्दा आपल्याच सही चे पत्र उपस्थीत राहण्या करीता दीले. म्हणजे मुख्याधिकरी साहेब स्वतःचे गाऱ्हाणे स्वतःच ऐकतील अशी हिटलर शाही कशाकरीता? आणि आता ज्यांनी आक्षेप करीता अर्ज दीले होते. पुन्हा त्यांना नोटीस देऊन बोलविण्याचे कारण काय? कोणाच्या आदेशान्वये? जो पर्यंत जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेत नाही व विरोधात ही निर्णय दिला. तर अपील दाखल करता येते मग सामान्य जनतेला नोटीस देऊन नगरपंचायत मधे बोलवण्याचे कारण काय? घनकचरा व्यवस्थापन करीता आधी जाहिरात देऊन पुन्हा ती जाहिरात रद्द करण्याचे कारण काय? नियमानुसार असा करता येतो का? सर्व नियम तुम्हालाच समजतात, पुन्हा लाखो रुपये वाढवून जाहिरात काढण्यात आली कारण काय? या मधे शुद्ध भ्रष्टाचार करीत आहेत. म्हणूनच त्या अकरा लोकांना अडवांस प्रत्येकी पन्नास, पन्नास हजार रुपये दीले काय? घरकुलाचे उर्वरीत पैसे पवनी, तुमसर नगर पंचायतला जमा झाले, पण मोहाडी नगर पंचायतला का झाले नाही ?
एवढी हिटलर शाही खपवून घेतली जाणार नाही, हे सर्व भ्रष्टाचार जनतेसमोर येण्याकरीता नगर विकास संघर्ष समितिचे खुशाल कोसरे, बबलू सैय्यद, पुरूषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर , जयराम गायधने, हंसराज नीमजे व मोहाडी शहरातील नागरिकांना सोबत घेऊन लवकरच नगर पंचायत सामोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात येत आहे.